आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मारहाणकरून लुटणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा चोरीचा माल विकत घेणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यास एक वर्षाची शिक्षा ठोठावली. दीड वर्षांपूर्वी बसस्थानकाजवळील पोस्ट ऑफिसजवळ दारू पिऊन आरोपींनी धुडगूस घातला होता चाेरी करून ते पळून गेले होते.

संदेश उर्फ शिवा दिलीप पटले, शूटर उर्फ सतीश प्रकाश गुडदे युसूफअली नादरअली, असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. दीड वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिसजवळ रात्रीच्या सुमारास अनु नामक युवतीवरून जुनेद यांच्यासोबत संदेश शूटरचा वाद झाला होता. संदेश शूटरने बिअर पिऊन जुनेदला मारहाण केली होती. त्यात जुनेद गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर संदेश शूटरने जुनेदजवळील मोबाइल, रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. जुनेदच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी संदेश उर्फ शिवा दिलीप पटले शूटर उर्फ सतीश प्रकाश गुडदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सिटी काेतवाली पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी केला. त्यांनी या दोन्ही अारोपींना परभणी वसमत येथून ताब्यात घेऊन त्यांना अटक केली होती. संपूर्ण प्रकरणात आरोपींना साथ देणारा, चोरीचा माल विकत घेणारा युसूफअली नादरअली यालासुद्धा आरोपी केले. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी झाली. न्यायालयाने आरोपी संदेश शूटर यास प्रत्येकी अडीच वर्षे कारावासाची शिक्षा दोन हजारांच्या दंडाची शिक्षा, माल विकत घेणाऱ्या आरोपी युसूफअली नादरअली यास एक वर्ष कारावासाची शिक्षा एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

नागलकरांच्या तपासाचा सन्मान
सहायकपोलिस निरीक्षक, तेल्हाराचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी चांगल्या प्रकारे या घटनेचा तपास केला होता. त्यांच्या तपासामुळे आरोपींना शिक्षा झाली आहे. गुन्हेदोषसिद्धी योजनेंतर्गत नागलकर यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशाेर मीणा यांनी सन्मान केला.
बातम्या आणखी आहेत...