आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार; तीन जणांना केले निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, पोलिसांवर गोळीबार आदी प्रकरणांत गुन्हे दाखल असलेला आरोपी गजानन तौर हा बुलडाणा कारागृह पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याची घटना १९ ऑगस्टला जालना येथे घडली.

या प्रकरणी तीन पोलिसांना निलंबित केले असून, आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलिस ठाण्यात गजानन तौरविरुद्ध अपहरण गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

त्याला अटक करून बुलडाणा येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. घनसावंगी प्रकरणी न्यायालयीन कामानिमित्त बुलडाणा मुख्यालयातील पोहेकाॅ. विलास गवारे, पोकॉ. उत्तम चव्हाण, बबन जाधव हे त्याला जालना येथे घेऊन गेले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला बुलडाणा येथे परत आणताना जालन्यातील आशीर्वाद हॉटेलवर जेवणासाठी पोलिस थांबले असता, आरोपीने त्यांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. या प्रकरणी पोलिसांना निलंबित करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातही गजाननवर गुन्हे दाखल आहेत. तीन पोलिसांच्या निलंबनानंतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
बातम्या आणखी आहेत...