आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाण्‍यामध्ये कोट्यवधीच्या रेशन धान्याची उचलच नाही, वाहतूक कंत्राटदारामुळे पुरवठयात गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - सन २००८ ते २०१६ पर्यंतच्या काळात सुमारे १०० कोटी रुपयांचा रेशनचा माल वाहतूक कंत्राटदारामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नसल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी उपायुक्तांनी चौकशी अहवाल मागितला आहे.
 
पुरवठा अधिकारी कर्मचारी यांच्यातील वादाचे प्रकरण उपायुक्त अमरावती यांचेकडे पूर्वीच पोहचले असल्याने त्यांनी २८ सप्टेंबर रोजी एक पत्र पाठवूनच जिल्हा पुरवठा अधिकारी कर्मचारी यांच्यातील बेबनाव असल्याचे स्पष्ट केले आहे. तर गेल्या आठ वर्षापासून वाहतूक कंत्राटदारामुळे मालाची झालेल्या उचलीबाबत तातडीने अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहे. 
 
२०१० ते २०१६ पर्यंत शंभर कोटींच्या अासपास धान्याची उचल झाल्यामुळे लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात असतांना पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर कामबंद धरणे आंदोलन करण्यात आले होते. सदरचे आंदोलन राज्यस्तरावर सर्वच ठिकाणी पुरवठा विभागाच्या प्रलंबित मागण्यांसाठी होत असतांना बुलडाण्यात मात्र या आंदोलनाला अधिकारी विरुध्द कर्मचारी असे वळण लागल्याने जिल्हाधिकारी यांचेसमोर एक प्रशासकीय आवाहन उभे ठाकले आहेे. तर पुरवठा विभागात नेमके अधिकारी कर्मचारी यांच्यातील वाद पेटविण्यात कोणत्या कंत्राटदाराचा हात आहे. हे सुध्दा जिल्हाधिकारी यांना बघणे उचित ठरणार आहे. परंतु, असे चौकशीचे पत्रच उपायुक्त यांनी पाठवून ठराविक चार मुद्दयावर चौकशी मागविली असल्याने पुरवठा विभागाचा गुंता वाढत चालला आहे. तर सध्या धान्य पुरवठा करण्याचे कंत्राट संबंधित दुसऱ्या यंत्रणेला मिळाल्याने पुरवठा विभागात राजकारण रंगले आहे.मात्र, शासकीय चौकशी करावीच लागणार आहे. 
 
नव्यानेकोटी ७६ लाखांच्या दंडाची तलवार :एप्रिल २०१० ते मे २०१६ या कालावधीत वाहतुक कंत्राटदाराने ३७ कोटी ६० लाख ८८१ रुपयांचे धान्याची उचल केली नाही. त्यामुळे या कालावधीतील कोटी ७६ लाखाचा दंड आकारणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.विभागीय आयुक्त यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु अाहे. जवळपास १०० कोटींच्या या प्रकरणात कोट्यवधीचा दंड आकारणी वाहतूक कंत्राटदाराकडून करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू.काळे यांनी सांगितले.
 
प्रकरण पेटले ४४ लाखांच्या दंडापासून 
खासदार प्रतापराव जाधव यांनी सन २००८ पुरवठा विभागाच्या वाहतूक कंत्राटामुळे धान्य मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. १३ मे २००८ ते ३१ मार्च २०१० पर्यंतच्या कोटी ३४ लाख ९७ हजार ५८२ रुपयाचे धान्य लाभार्थींपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे नुकसान झाल्याचा अहवाल पुरवठा विभागाने काढला त्यावर ४४ लाख ५४ हजार ८५४ रुपयाचा दंड आकारण्यात आला होता. 
 
उपायुक्तांच्या आदेशानुसार कारवाई 
उपायुक्तयांनी पाठविलेल्या पत्रातच जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कर्मचारी एेकत नसल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. त्याचा अहवालही मागविला आहे. उपायुक्तांच्या आदेशानुसार काम सुरु आहे. जिल्हाधिकारी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून आहे. 
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा. 
 
बातम्या आणखी आहेत...