आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नी आणि सासऱ्यावर गोळ्या झाडून सीआरपीएफ जवानाची आत्‍महत्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्‍थळाची पाहणी करताना पातूर पोलिस ठाण्‍याचे कर्मचारी. - Divya Marathi
घटनास्‍थळाची पाहणी करताना पातूर पोलिस ठाण्‍याचे कर्मचारी.
अकोला - जिल्‍ह्यातील माळराजुरा (ता. पातूर) येथे दिवाळीसाठी आलेल्‍या एका सीआरपीएफ जवानाने पत्‍नी आणि सासऱ्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. छगन प्रल्हाद जाधव (45) असे त्‍याचे नाव आहे. या घटनेत त्‍याची पत्‍नी सुशीला छगन जाधव (40) आणि सासरा मखराम मेघाजी राठोड (70) यांचाही मृत्‍यू झाला. ही घटना (सोमवार) सकाळी 10 वाजताच्‍या सुमारास घडली.
नेमके काय आहे प्रकरण ?
छगन याचे माळराजुऱ्याजवळ 12 किमी अंतरावर असलेल्‍या मेडशी (जि. वाशीम) वाशीम येथील सुशीला यांच्‍यासोबत लग्‍न झाले होते. काही दिवस सोबत राहिल्‍यानंतर दोघांमध्‍ये वाद व्‍हायला लागले. दरम्‍यान, छगन सुशीला सोडून दिल्‍ली येथे नोकरीसाठी गेला. यावर्षी 13 नाव्‍हेंबर रोजी दिवाळीच्‍या दीर्घ सुटीवर तो गावी आल्‍याने आपल्‍या पोरीला कधी नांदायला नेणार असा, जाब सुशीला यांचे वडील मखराम यांनी त्‍याला विचारला. यातून रागाच्‍या भरात छगन याने आपल्‍या बंदुकीतून सासरा मखराम आणि पत्‍नी सुशील यांच्‍यावर गोळी झाडली. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. त्‍यानंतर स्‍वत:च्‍या डोक्‍यातही गोळी मारून घेतली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...