आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"दिव्य मराठी\'वर अकोलेकरांनी केला \"प्रेमाचा वर्षाव\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोलेकरांच्या प्रेमाच्या पाठबळावर तिसऱ्या वर्षांत यशस्वी पदार्पण करणाऱ्या दैनिक दिव्य मराठीवर अकोलेकरांनी पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव केला. अकोलेकरांच्या साक्षीने ‘दिव्य मराठी’चा दुसरा वर्धापन दिन शहरातील महाराजा अग्रसेन भवनात उत्साहात पार पडला.
दुपारच्या हलक्याशा पाऊस सरीनंतर सायंकाळी पासूनच अकोलेकरांनी हजेरी लावण्यास प्रारंभ केला. ‘दिव्य मराठी’च्या दोन वर्षांतील वाटचालीत अकोलेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने दिलेले सकारात्मक पाठबळाची प्रशंसा करत आम्ही आपल्यासोबत असल्याच्या भावना या वेळी अनेकांनी व्यक्त केल्या. वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण, साहित्य, धर्म-अध्यात्म, वन-पर्यटन, प्रशासन यांसह सर्वच क्षेत्रांतील घटकांचा समावेश होता.

राजकीयक्षेत्र : महापौरउज्ज्वला देशमुख, जिल्हा परिषदचे अध्यक्ष शरद गवई, उपमहापौर विनोद मापारी, विजय अग्रवाल, वसंत खंडेलवाल, संदीप देशमुख, विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, शेखर पांडे, अब्दुल जब्बार, भाजपचे महानगराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे, किशोर मांगटे पाटील, हरीश आलिमचंदानी, दीपक मायी, प्रथम महापौर सुमनताई गावंडे, उषा विरक, धनश्री अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, काँग्रेसचे महानगराध्यक्ष मदन भरगड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई, नगरसेवक राजकुमार मूलचंदानी, रमाकांतजी खेतान, गोपी ठाकरे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शेख अजिज, शेखर गवई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शैलेश बोदडे यांनी हजेरी लावली.

अधिकारी वर्ग
महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे, महापालिका उपायुक्त माधुरी मडावी, कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर, नवीन चितळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ठाणेदार प्रकाश सावकार, ठाणेदार अनिरुद्ध अढाव, ठाणेदार सुभाष माकोडे, ठाणेदार राजेंद्र माळी, सुनील उपाध्ये, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, शहर अभियंता अजय गुजर, क्षेत्रीय अधिकारी जी. एम. पांडे, वासुदेव वाघाळकर, कैलास पुंडे, रमेश ठाकरे, राजेंद्र घनबहादूर, सहायक माहिती अधिकारी नितीन डोंगरे, चंद्रकांत पाटील, शाखा अभियंता राम पाटील, सुनील टोंभे, गजानन इंगोले, जि. प. अधीक्षक प्रदीप खाडे, डॉ. मनोहर तुपकर, शेखर गवई, नीलेश देव, प्रशांत पिंजरकर, विष्णू डोंगरे, संदीप चिमणकर, उमेश बावणे, संजय चव्हाण, संजय खराटे, नागोराव निंर्बेते, विजय पारतवार, सतीश वखारीया, अॅड. वैशाली गिरी भारती, अॅड. रिना यादव यांनी हजेरी लावली.

कला, साहित्य क्षेत्र
कला, साहित्य क्षेत्राचाही राबता वर्धापन दिनात दिसून आला. यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सतीश पिंपळे, किशोर पिंपळे, व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, छायाचित्रकार संजय आगाशे, यशवंत देशमुख, सुधाकर देशमुख, अजय आगाशे, मुकुंदराव देशमुख, प्रवीण ठाकरे, दीपक शर्मा, जगदीश झुनझुनवाला, मोहन सराग, चंद्रकांत पाटील, अत्ता कुरेशी, रजा कुरेशी, हिंमत कावरे, सुचित देशमुख, साहित्यिक तुळशीराम बोबडे, पद््माकर कळस्कर, प्रा. ममता इंगोले, सूरज भांगे, किशोर बळी, सुहास कुळकर्णी, देवकाबाई देशमुख, नीरज आवंडेकर आदींचा समावेश होता.

शिक्षण क्षेत्र
शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, महादेव भूईभार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, सौ. भडांगे, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे, सेफ हँडचे प्रा. नितीन ओक, प्रा. विद्या ओक, गणिततज्ञ एस. व्ही. राघवन, प्रा. सतीश जाधव, प्रा. गणेश बोरकर,प्रा.गोविंद खांबलकर, प्रा. राम कुटे, बळीराम झामरे, गजानन ढगे, गजानन चौधरी, दिनेश तायडे, मनीष गावंडे आदींचा समावेश होता.

सामाजिक क्षेत्र
सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांमध्ये ग्राहक चळवळीतील अग्रणी सुधाकर जकाते, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, मनोहर हरणे, बी. एस. देशमुख, पुरुषोत्तम शिंदे, मधुकरराव देशमुख, ज्येष्ठ नागरिक गणेश घावट, सदाशिव करुले, रामराव हुरपडे, गुरुदेव सेवामंडळाचे भानुदास कराळे, रामेश्वर बरगट, योगेश खोडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, प्रा.अजाबराव भोंगाडे, आनंदराव सुकळीकर, संजय हिरानंदानी, सुनिल हिरानंदानी, अमोल अग्रवाल, श्रीकांत बिहाडे, योगेश थोरात, मधुकर गणेशपुरे, प्रदीप गोयनका, उल्हास मोकळकर, गोपीअण्णा चाकर, मनोज कस्तुरकर, डॉ. विजय दुतोंडे, विनायक पवार, राजेंद्र देशमुख, योगेश थोरात, डिगांबर गायकवाड, शत्रुघ्न मुंडे, सै. जफर सै. हसन, सै. यासिन उर्फ बब्बूभाई आदींचा समावेश होता.

क्रीडा क्षेत्र

अकोल्यातील क्रीडा क्षेत्राने ‘दिव्य मराठी’च्या भूमिकेचे स्वागत करून आम्ही सोबत असल्याची ग्वाही दिली. यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांचेसह अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा व्हीसीएचे समन्वयक भरत डिक्कर, परिमल कांबळे, सुमेध डोंगरे, पवन हलवणे, जिल्हा शारीरिक शिक्षक क्रीडा महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप थोरात, महानगराध्यक्ष प्रभाकर रुमाले, संजय मैंद, सतीश दहातोंडे, प्रशांत पावडे, अमोल चिलात्रे, रवींद्र म्हैसने, रघुनाथ अंधारे, प्रमोद गावंडे, गजानन चंदन, मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत तराळ, अशोक डेरे, प्रकाश दाते, उमेश अंबारखाने, बुद्धिबळ प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल, क्रिकेट पंच अनिल एदलाबादकर, रवींद्र मेश्राम आदींचा समावेश होता.

पर्यावरण, पर्यटन क्षेत्र
अकोला वन, वन्यजीव सामाजिक वनीकरणसह पर्यावरण संवर्धनात कार्यरत स्वयंसेवी संस्थांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सुनील जयस्वाल, वन्यजीव विभागाचे सहायक उपवन संरक्षक रमेशप्रसाद दुबे, सामाजिक वनीकरणचे प्रचार-प्रसिद्धिप्रमुख गोविंद पांडे, सातपुडा फाउंडेशन तथा निसर्गकट्टाचे संचालक अमोल सावंत, राहुल ओईंबे, गौरव झटाले, सुशांत सावंत, सर्पमित्र बाळ काळणे, शेख महम्मद उर्फ मुन्ना, अरुण वाढोकार, अमोल नवले, युथ होस्टेल असोसिएशनचे शरद भागवत, मानद् वन्यजीव रक्षक देवेंद्र तेलकर, तर पर्यटन क्षेत्रात कार्यरत डॉ. माधव देशमुख, श्रीरंग पाठक, स्वप्निल रोम यांनी हजेरी लावली.

आरोग्य क्षेत्र
आरोग्य क्षेत्रातील मंडळीनेही ‘दिव्य मराठी’चे कौतुक केले. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नवीन तिरुख, डॉ. प्रशांत वानखडे, डॉ. गजानन वाकोडे, डॉ. विजय गरकल, डॉ. विजय दुतोंडे, डॉ. जगदीश खांदेतोड, डॉ.संदीप चव्हाण, डॉ.विजय बिहाडे, डॉ.प्रशांत वानखडे, यांचा समावेश होता.

पत्रकारिता क्षेत्र
माध्यमातील मान्यवरांमध्ये ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, गजानन शेळके, अनिल माहोरे, अनंत गावंडे, अॅड. सुधाकर खुमकर, राजूभाऊ उखळकर, राजकुमार भीतकर, जीवन सोनटक्के, संजय देशमुख, जीवन सोनटक्के आदींची उपस्थिती होती.

सुशील डोडिया, पीयूष कोरडिया, श्याम सारभुकन, विजय रांदड, सत्यनारायण रांदड, बबनराव ठाकरे, जफरभाई यांनी द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. दिव्य मराठीचे सीओओ निशीत जैन, राज्य संपादक प्रशांत दीक्षित, कार्यकारी संपादक सचिन काटे, युनिट हेड प्रवीण ससाणे यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

दैनिक दिव्य मराठीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अग्रसेन भवनात सकाळच्या सत्रात ‘दिव्य मराठी’चे कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांसाठी रंगारंग सोहळ्याचे आयोजन झाले. यामध्ये गीतगायन, नृत्य, कव्वाली, फॅन्सी ड्रेस, बोलते तारे यांनी मनोरंजन केले, तर योगी ग्रुप आणि धर्मा डान्स ग्रुपने विविध आकर्षक नृत्य सादर केले. या वेळी झालेल्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात तबल्यावर मिलिंद सभापतीकर यांनी तर हार्मोनिअमवर शंतनू जागीरदार यांनी साथ दिली. जुन्या काळातील मुलांचे मैदानी खेळ आज हरवल्याची व्यथा मांडणाऱ्या ‘वो कागज की कश्ती’ लघू नाटिकेने लक्ष वेधले.