आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील महिला म्हणतात, डान्सबार नकाेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डान्स बार बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. डान्स बार बंदच राहावे यासाठी पावले उचलली जातील, असे शासन सांगत अाहे. याबाबत शहरातील महिलांनी मात्र, डान्स बार बंदीला पूर्ण समर्थन दिले आहे. शहरातील विविध क्षेत्रांतील महिलांनी डान्स बार पूर्णपणे बंद असावे, अशी भूमिका मांडली आहे.
सामाजिक स्थैर्य आणि कुटुंब व्यवस्था अबाधित राहण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी डान्स बार पुन्हा सुरू करण्यास कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांतील महिलांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न "दिव्य मराठी'ने सर्वेक्षणाद्वारे केला. महिलांनी डान्स बार सुरू करण्याला कडाडून विरोध केला असून, डान्स बार बंद असावे, असे मत नोंदवले. दरम्यान, डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर मात्र महिलांनी उपजीविकेसाठी डान्स बार हे एक पर्याय नसून, दुसऱ्या पर्यायांचा अवलंब करावा. महिलांचा सन्मान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डान्स बारला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या सन्मानाला धोका असणारे काम नको. त्याऐवजी दुसरे काम करावे. उपजीविकेसाठी दुसरी नोकरी करता येते, हाच पर्याय नाही.

उपजीविकेसाठी डान्सबार मधील महिलांना इतर काेणतेही सन्मानाचे काम करता येऊ शकते. त्यामुळे असे म्हणणे याेग्य वाटत नाही.

डान्स बारवर पूर्णपणे बंदी असावी, असे १०० टक्के महिलांचे म्हणणे आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करता ते योग्य नाही.

या सर्वेक्षणात ‘दिव्य मराठी’ने डॉक्टर, वकील, राजकीय, अभियंता, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांसह काही गृहिणींशीही संपर्क साधण्यात अाला. या विषयावर त्यांची मते जाणून घेण्यात अाली. त्यांनी व्यक्त केलेली मते जशीच्या तशी नाेंदवण्यात अाली.