आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला क्लबचा ‘दर्शन’ भारतीय क्रिकेट संघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला क्रिकेट क्लब, व्ही. सी. क्रिकेट अकादमीचा अष्टपैलू खेळाडू दर्शन गिरीश नळकांडेची १५ जुलै पासून इंग्लंड येथे जाणाऱ्या १९ वर्ष वयोगटातील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली असून, जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालेला तो पहिला खेळाडू आहे. भारतीय संघात निवडलेल्या खेळाडूंचे शिबिर जुलै पासून बेंगलोर येथे होणार असून, १५ जुलैला संघ इंग्लंडला रवाना होईल. 
 
दर्शन नळकांडे हा मध्यमगती गोलंदाज तर मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू आहे. वयाच्या वर्षापासून त्याने अकोला क्रिकेट क्लब येथे खेळण्यास सुरूवात केली. पाच वर्षांपासून व्ही. सी. ए. क्रिकेट अकादमी नागपूर येथे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी त्याने १४ वर्ष खालील विदर्भ संघाचे नेतृत्व केले असून, १६ वर्षाचा असताना त्याला १९ वर्षाखालील विदर्भाच्या संघात स्थान मिळाले होते. यापूर्वी त्याच्या बी. सी. सी. आय अंतर्गत १६ वर्षाखालील स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शनाने १६ वर्षाखालील एन. सी. ए. शिबिरासाठी त्याची देशातून २५ मध्ये निवड झाली होती. तेथील उत्कृष्ट प्रदर्शनामुळे बेंगलोर जवळील शिमगो येथे आंतरविभाग क्रिकेट स्पर्धेसाठी मध्य विभाग क्रिकेट संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली होती. शिमगो येथे दक्षिण विभाग विरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने गोलंदाजी करत दोन्ही डावात गडी बाद करून मध्य विभागाला विजय मिळवून दिला. वर्षांपासून दर्शनच्या कामगिरीत प्रगती होत आहे. दर्शनने यावर्षी १९ २३ वर्षाखालील विदर्भ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली असून, व्ही. सी. ए. जामठा येथे १९ वर्षाखालील भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या कसोटी सामन्यावेळी दर्शनला सरावासाठी बोलवले होते. यावेळी माजी कर्णधार, १९ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दर्शनच्या खेळाचे कौतुक केले. दर्शनची १९ वर्षाखालील भारतीय संघात झालेली निवड ही अकोला क्रिकेट क्लबसाठी अभिमानाची बाब असून, जिल्ह्यातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या या निवडीबद्दल अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाऊ पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शाह, ऑडिटर दिलीप खत्री, व्हीसीएचे जिल्हा संयोजक अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर, सदस्य अॅड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, जयेश कुकडे, रवी ठाकूर, सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, देवकुमार मुधोळकर यांच्यासह अकोला क्रिकेट क्लब जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे.