आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या मुलीनेच उगारला बापावर हात, बाप म्हणाला, आता जगण्यात अर्थच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पती-पत्नीतवाद झाले... वादात आईची बाजू मुलीने घेतली.. बाप एकटा पडला.. त्याची अगतिकता पाहून मुलीने बापावरच हात उगारला... मुलीने हात उगारताच बापाच्या पाया खालची वाळूच सरकली. आता जगण्यात अर्थच काय, अशा गोंधळलेल्या विचारात बाप असतानाच मायलेकी पोलिस ठाण्यात पोहाचल्या. अन् चोरावर मोर म्हणतात, त्याप्रमाणे बापा विरोधात मुलीनेच तक्रार दिली. याउपर आपण सीए करीत असून चांगले वाईट समजत असल्याची मखलाशी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सिव्हिल लाईन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी उघडकीस आली. 
 
जवाहर नगर परिसरात एक सदगृहस्थ राहतात. सिव्हिल लाइन्स रोडवर त्यांचे मेडिकल आहे. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. तिच्या सुखासाठी ते रात्रंदिवस झिजत आहेत. असे असताना आज तिच मुलगी सीए करीत आहे. कौंटुंबिक कारणांवरून आई-वडिलांमधील भांडणात शनिवारी ती मध्ये पडली. रागाच्या भरात तिने जन्मदात्या बापावरच हात उगारला. त्याला मारहाण केली. मुलगी मारहाण करत असल्याचे पाहून उलट बापाचा हात उगारलाच नाही. तो निमुटपणे पाहतच राहिला. 
 
अखेर मायलेकी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहचल्या. त्यांनी पोलिसात तक्रार केली. प्रथमदर्शनी त्यांची बाजू ऐकून पोलिसांनी बापाला पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याची पायरी चढताच बापाचे डोळे पानावले. आता एवढेच बघायचे बाकी होते. असे म्हणून बाप निमुटपणे दोघी मायलेकीकडे पाहत होता. मुलीनेच जन्मदात्यावर हात उगारणारी घटना घडल्याने पाहणारे थक्कच झाले. 
 
मुलांनी बापावर हात उगारणे चुकीचे 
आईवडील मुलांचे हितच पाहतात. आईवडील चुकतही असतील पण त्यांच्यावर हात उगारणे. हे कुठल्याच संस्कृतीला मान्य नाही. मुलांनी आईवडिलांचा आदर केला पाहिजे. आईवडिलांवर हात उगारणे हे चुकीचेच आहे.’’ -अन्वरएम. शेख, ठाणेदार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे 
 
पोलिसही गेले चक्रावून 
एकीकडे मुलीच्या जन्माचे स्वागत होत असताना मुलीनेच जन्मदात्यावर हात उगारणारी घटना घडल्याने पाहणारे थक्कच झाले. पोलिसही या घटनेमुळे काहीवेळ चक्रावून गेले. मात्र त्या मुलीच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप दिसून आला नाही, हे विशेष. 
बातम्या आणखी आहेत...