अकोला - लग्नाला१२ वर्षे होऊनही मुलबाळ होत नसल्यामुळे सासू नेहमीच सुनेचा छळ करीत असे. अखेर असह्य झाल्यामुळे सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने तिच्या हातावर सासूच मृत्युला कारण असल्याचे पेनाने लिहून ठेवले आहे. ही घटना लहान उमरीमध्ये मंगळवारी दुपारी उघडकीस आली. सासू पतीविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गा संतोष नहाटे वय ३२ असे विवाहितेचे नाव आहे. १२ वर्षापूर्वी दुर्गाचे लग्न संतोष रहाटे याच्याशी झाले. तिला मुल होत नसल्याने तिची सासू कुसूम लक्ष्मण रहाटे ही तिला टोमणे मारून तिचा छळ करायची. तिच्या छळाला कंटाळून दुर्गाने आत्महत्येचे पाऊल उचलले घरातच मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्गाची आई देवकाबाई भगवान मुंढे यांनी पोलिसांत तक्रार दिली की, मुलगी दुर्गाला मुलबाळ होत नसल्यामुळे तिचा पती तिची सासू तिचा छळ करीत असत. यापूर्वी जावई संतोष याने ऑटो घेण्यासाठी पैसे मागितले होते. आपल्या कुवतीप्रमाणे अनेकवेळा त्याला पाच-दहा हजार रुपये सुद्धा दिले होते.
आता तो पुन्हा जमीनीमध्ये हिस्सा मागत होता. त्यामुळे तो मुलीला नेहमीच त्रास देत होता. आता तो चार एकर शेतीत हिस्सा मागत होता. त्याच्या आणि सासूच्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला तिचा पती सासूच जबाबदार आहेत. यावरून पोलिसांनी मंगळवारी रात्री पती संतोष लक्ष्मण नहाटे सासू कुसूम लक्ष्मण नहाटे या मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अन्वर एम. शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संतोष अघाव करीत आहेत.
चार एकर शेतीत मागत होता हिस्सा : दुर्गालातीन बहिणी आहेत. दुर्गाच्या आईकडे पातूर तालुक्यातील नांदखेड येथे चार एकर शेती आहे. या शेतीमध्ये दुर्गाची सासू हिस्सा घेण्यासाठी सुनेवर दबाव टाकत होती. तर पतीला त्यासाठी मारझोड करीत होता. असे दुर्गाच्या आईने पोलिसांना सांगितले.
दुर्गाने हातावर लिहून ठेवले
मृत्यूपूर्वीदुर्गाने हातावर पेनाने लिहले, ‘माझी सहनशक्ती संपली मला सहन होत नाही माझ्या सासुमूळे’ यावरून दुर्गाचा छळ होत असल्याचे दिसून येते.