आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीसीअार लागू, बिल्डरांना अच्छे दिन, मनपाचे उत्पन्न वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मनपासाठी एकसमान विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) लागू झाल्याने मनपाचे उत्पन्न वाढणार अाहे. या निमित्ताने विकासाचा मार्ग माेकळा हाेणार असून, बिल्डरांनाही अच्छे दिन अाल्याचा दावा जाणकारांकडून हाेत अाहे.

गत अनेक दिवसांपासून डीसीअार लागू करण्याचा मुद्दा चर्चेत हाेता. डीसीअार लागू हाेत नसल्याने अनेक संतुलीत विकासाला खिळ बसल्याचा अाराेप हाेत हाेता. विशेषत: बांधकाम क्षेत्रातील विकास अाता झपाट्याने हाेणार अाहे. अनेक दिवसांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प अाहे. त्यामुळे सिमेंट, लाेखंडासह इतरही बांधकाम साहित्याच्या मागणीत घट झाली हाेती. मजुरांच्या हातालाही काम नव्हते. खरेदी-विक्रीचे व्यवहारही ठप्प हाेते.

एफएसअाय वाढणार :
डीसीअारलागू झाल्याने एफएसअाय (चटई क्षेत्र) वाढणार अाहे. सध्या केवळ एकच एफएसअायची मुभा अाहे. डीसीअार लागू झाल्याने पावणे दाेनच्या जवळपास एफएसअायची शक्यता अाहे. परिणामी बांधकाम क्षेत्रात तेजी येईल. काही दिवसांपूर्वी मनपाने अनधिकृत बांधकामाविराेधात माेहिमच सुरू केली हाेती. मंजूर नकाशाला तिलांजली देत बांधकाम केलेल्या इमारतींवर हाताेडा चालवला हाेता. त्यामुळे बांधकामे रखडली हाेती. अाता ही बांधकामे पुन्हा सुरू हाेणार अाहेत. बांधकाम १०-२० टक्के झालेली अनियमितता करणाऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी, त्यापेक्षा जास्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मात्र अद्दल घडणार अाहे.

मनपाचे उत्पन्न वाढणार
डीसीअारलागू झाल्याने एफएसअाय (चटई क्षेत्र) वाढणार असल्याने एकाच ठिकाणी बांधकाम वाढणार अाहे. परिणामी मनपाला करस्वरुपात जादा महसूल प्राप्त हाेणार अाहे. टिडीअार कायद्यानंतर अाता डीसीअार लागू झाल्याने मनपाचे उत्पन्न वाढणार अाहे. या महसूलाचा फायदा शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी व्हावा, अशी मागणी अकाेलेकरांमधून हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...