आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कृतीमध्ये आणा : आचार्य वेरुळकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,’ असे आवाहन गुरुकुंज मोझरीचे आजीवन प्रचारक हरिभाऊ वेरुळकर यांनी केले. पाचव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 


संमेलनाध्यक्ष सत्यपाल महाराज, आजीवन प्रचारक भास्करराव विघे गुरुजी, बेले गुरुजी, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, अॅड. मोतीसिंह मोहता, गंगाधर पाटील, स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे, प्रा. ममता इंगोले, खवसेदादा, किशोर वाघ व्यासपीठावर होते. राष्ट्रसंतांचे विचार देशाच्या विकासास सहायक आहेत, सर्वांना सन्मान मिळवून देणाऱ्या प्रत्येकाने विचारांची शिदोरी जोपासावी, असे आवाहन भास्करराव विघे गुरुजी यांनी केले. गुलाबराव गावंडे, कृष्णा अंधारे यांनीही विचार मांडले. सत्यपाल महाराज यांनी उपस्थिताना संबोधित करताना संमेलनाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 


बळीराजाला समर्पित संमेलनामध्ये ग्रामगीतेतील शेतीविषयक धोरण यावर परिसंवाद झाला. अॅड. विनोद साकरकार अध्यक्षस्थानी होते. प्रदीप देशमुख, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, मधुकरराव सरप, श्रीकृष्ण ठोंबरे, अरविंद देठे, अरविंद घोगरे, गजानन हरणे, मुकुटराव बेले उपस्थित होते. वक्त्यांनी राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाने बळीराजावर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप केला. युवकांसाठीच्या सत्रात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शासन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम राबवत असल्याचे सांगितले. सरकार म्हणून आमची जी जबाबदारी आहे तिची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू अशी ग्वाही त्यांनी दिली.


शासनाच्या योजना किती कोटीच्या आहेत यावर योजनांचे यश मोजू नये असे सांगून बळीराजाला श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामगीता जीवन विकास परीक्षा: काळाची गरज, राष्ट्रसंतांना अपेक्षित युवक, राष्ट्रसंतांना अपेक्षित महिलोन्नती यावर परिसंवाद झाला. युवकांच्या सत्रांत सचिन बुरघाटे, प्रशांत ठाकरे, स्वप्नील इंगोले आणि शिवाजी भोसले यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष रत्नपारखी होते. संचालन कृष्णा पखाले यांनी केले. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना. संदीपपाल महाराजांचे प्रबोधन होऊन संमेलनाची सांगता झाली. 

बातम्या आणखी आहेत...