आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडूनच प्रेताची अवहेलना, तीन दिवसांनंतर केला पंचनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वाशीम येथील रुग्णाचा १० नोव्हेंबर रोजी मृत्यू झाल्यानंतरही सर्वोपचार रुग्णालय पोलिस चौकीतील पोलिसांनी पंचनामा करण्यास टाळाटाळ केल्याचे उघड झाले आहे. शेवटी संबंधित डॉक्टरने सिटी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रेताचा पंचनामा करण्यात आला.

वाशीम येथील शासकीय रुग्णालयातून एका अनोळखी व्यक्तीस उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात नोव्हेंबर रोजी आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. या इसमाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नाही. सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा १० नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी त्याचा मृत्यू झाल्यानंतर तत्काळ शवविच्छेदन विभागातील डॉ. चिखलकर यांनी सर्वोपचार रुग्णालयातील पोलिस चौकीत इन्फार्म केले. मात्र, ही घटना आमच्या हद्दीतील नसल्याने आम्ही पंचनामा करू शकत नाही, असे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

१० ते १३ नोव्हेंबर, असे तीन दिवस ते प्रेत पंचनामा झाल्याने शवविच्छेदन करता तसेच पडून होते. शेवटी कंटाळून सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने याची माहिती सिटी कोतवाली पोलिसात दिली. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी सर्वोपचारमध्ये जाऊन त्या प्रेताचा पंचनामा केला. त्यानंतर प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले. यामुळे प्रेताचीही अवहेलन होत असल्याचे चित्र सर्वोपचारमध्ये दिसून आले.

आरपीएफ जवानांची कामगिरी कौतुकास्पद
ओडिशातीलव्यक्तीचा रेल्वेस्थानकावर मृत्यू झाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या मदतीने त्या प्रेताचे सर्वोपचारमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर स्वत: मोहता मिल परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला होता. एवढेच नाही, तर ओडिशातील त्या कुटुंबाला तिकीट काढून देऊन स्वत: रेल्वेत बसवून देण्याइतपत कर्तव्य बजावले होते. मात्र, इथे तर सिटी कोतवाली अंतर्गत येणाऱ्या चौकीतील पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी कर्तव्य बजावले नसल्याचे दिसून येते. आरपीएफ जवानांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे बोलल्या जात आहे.