आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात आढळले मृतावस्थेत अर्भक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कमलानेहरू नगराजवळील गणेश घाटाजवळ स्त्रीजातीचे अर्भक पाण्यात मृतावस्थेत आढळून आले. ही घटना सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी परिमल सिंह यांनी गर्भपाताचे प्रमाण नियंत्रित आणण्यासाठी फिट्स ट्रॅकिंग, हेल्पलाइनसारखे उपक्रम राबवले होते. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्या मार्गदर्शनात दैनंदिन तपासणीसह अवैध गर्भपात सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीसाठी विशेष माेहीम राबवली होती. त्यामुळे बऱ्यापैकी अवैध गर्भपात सोनोग्राफी केंद्रांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात प्रशासनाला यश आले होते. मध्यंतरीच्या काळात कारवाईचे सत्र थांबल्याने अवैध गर्भपाताने डोके वर काढल्याचे दिसून येते. सोमवारी सकाळी गणेशघाटाजवळील पाण्यात स्त्रीजातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रसूतीगृहांची चौकशी करू
^जुन्या शहरातील प्रसूतीगृहांची तपासणी करण्यात येईल. रविवारच्या रात्री जन्माला आलेल्या बाळांची माहिती घेण्याचा शोध घेण्यात येईल. नियमबाह्य गर्भपात करणे कायद्याने गुन्हा असल्याने अवैध गर्भपाताचा आग्रह कुणीही करू नये. शिवाय डॉक्टरांनी सुद्धा या भानगडीत पडू नये.'' डॉ.फारुख शेख, वैद्यकीय अारोग्य अधिकारी