Home »Maharashtra »Vidarva »Akola» Decision Of 1167 Members Today With 246 Sarpanchs

आकोला: जिल्ह्यातील 246 सरपंचासह 1167 सदस्यांचा आज फैसला

जिल्ह्यातील २४६ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदांची नावे उद्या, सोमवारी इलेक्ट्रॉिनक वोटिंग मशीनमधून (इव्हीएम) बाहेर

प्रतिनिधी | Oct 09, 2017, 09:54 AM IST

  • आकोला: जिल्ह्यातील 246 सरपंचासह 1167 सदस्यांचा आज फैसला
अकोला- जिल्ह्यातील २४६ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदांची नावे उद्या, सोमवारी इलेक्ट्रॉिनक वोटिंग मशीनमधून (इव्हीएम) बाहेर पडणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. सरपंच पदासाठी थेट निवडणूक घेण्यात आल्याने एकूण निकालास थोडा विलंब होण्याची शक्यता यंत्रणेने व्यक्त केली आहे.

निवडणुकीस पात्र असलेल्या २७२ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी सातही तालुक्यात मतदान घेण्यात आले. परंतु काही ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांची नामांकनादरम्यानच (बिनविरोध) निवड झाल्याने सरपंचासाठी २४६ तर सदस्यांसाठी २४५ ग्रामपंचायतींमध्येच प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी लाख २३ हजार ८९५ नागरिकांनी (७७.६४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या सर्वांनी कुणाला कौल दिला, हे उद्याच्या मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान मतमोजणीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि पोलिस खात्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. सरपंच आणि सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त बॅलेट युनीट (बीयू) वापरात आल्याने या दोन्ही पदांची मते एकाचवेळी परंतु वेगवेगळी मोजली जाणार आहेत. त्यामुळे सरपंच आणि वार्ड क्रमांक एकमधिल उमेदवारांचे निकाल बहुधा एकाचवेळी घोषित होणार आहेत. अकोला तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यापैकी दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही नामांकन भरले गेले नाही. शिवाय प्रत्येकी दोन गावांचे सरपंच आणि सदस्य अविरोध विजयी झाल्याने सरपंच पदासाठी ५१ तर सदस्य पदासाठी ५३ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. येथील सर्व विजयी उमेदवारांची नावे सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहेत.

अशीपुढे जाईल मतमोजणी प्रक्रिया
मत मोजणीसाठी प्रत्येक केंद्रात १५-१५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका ग्रामपंचायतीमध्ये कमाल तीन मतदारसंघ (वार्ड) असल्यामुळे एकाचवेळी पाच गावांची मतमोजणी सुरु होईल. ती संपल्यानंतर दुसऱ्या पाच गावांची मतमोजणी त्याच टेबलांवर केली जाणार आहे. अशाप्रकारे मतमोजणी क्रम पुढे जाईल.

Next Article

Recommended