आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस असल्याचे सांगून रेल्वेत दरोडा; चार प्रवाशांना लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 अकोला:  हावडा-मेल एक्स्प्रेसमध्ये भुसावळहून चढलेल्या दरोडेखोरांनी जनरल डब्यातील चार प्रवशांना लुटले. त्यानंतर कीर्र अंधारात चेनपुलिंग करून सात दरोडेखोर पळून गेले तर एकाला प्रवाशांच्या मदतीने आरपीएफ जवानाने पकडून ठेवले. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता मलकापूर-खामखेडच्या दरम्यान घडली. मारहाण करून लुटण्यात आलेले प्रवाशी पश्चिम बंगालचे आहेत. लुटमार करण्यात आलेले प्रवाशी काम करण्यासाठी मुंबईला गेले होते.
 
मुंबईहून शुक्रवारी रात्री १२८०९ क्रमांकाच्या हावडा-मुंबई मेलमध्ये जनरल डब्यात बसले होते. रात्री वाजता भुसावळहून त्या डब्यात आठ जण चढले. गाडी खामखेडजवळ आल्यानंतर गाडीत चढलेल्यांनी पोलिस असल्याचे सांगून दमदाटी करून एकेकाला संडासमध्ये नेले. तेथे त्यांना मारहाण केली
 
त्यांच्याजवळील ३५ हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी चेन पुलींग करून गाडी थांबवली सात जण पळून गेले. मात्र एका जणाला पकडून ठेवण्यात प्रवाशांना यश आले. त्यानंतर पेट्रोलिंगवर असलेले बडनेरा येथील आरपीएफचे जवान बाबुलाल धुर्वे एस.के. यादव यांनी गजानन सदाशिव ढाकरे (वय २० श्रीधरनगर घाटपुरी खामगाव ) याला पकडले शेगाव जीआरपीएफच्या हवाली केले. येथे प्रवाशी जमील शेख वाजीद शेख याच्या तक्रारीवरून जणांविरूद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

बडनेरा आरपीएफची कारवाई 
बडनेरा आरपीएफचे ठाणेदार सी.एस. पटेल यांच्या मार्गदर्शनात यापूर्वी अनेक दरोडेखाेरांना जेरबंद केले. विभागात त्यांची कामगिरी सरस आहे. त्यांच्या मार्गदर्शनात बाबुलाल धुर्वे एस.के. यादव यांनी केलेल्या कारवाईचे कौतूक होत आहे. यापूर्वी बाबुलाल धुर्वे यांनी नक्षल भागात दमदारी कामगिरी केली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...