आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजारांची मागणी; पोलिसांविरुद्ध गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- स्वत:च्या नातेवाइकांविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी तक्रारदार महिलेकडून ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या मूर्तिजापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्याविरुद्ध सापळा लावण्यात आल्याची कुणकुण लागल्यामुळे त्याने लाच स्वीकारली नाही.
मूर्तिजापूरची महिला तक्रारदार आणि तिच्या नातेवाइकांविरुद्ध मूर्तिजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र रूपने याच्याकडे देण्यात आला होता. तक्रारदार महिला आणि तिच्या नातेवाइकांविरुद्ध कारवाई टाळायची असेल, तर महेंद्र रूपने याने सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराला भेटण्यासाठी रूपने हा मूर्तिजापूरहून अकोला येथे आला होता.
भेटीमध्ये १० हजारावर तडजोड झाली. दुसरे दिवशी सकाळी अकोला बसस्थानकावर पैसे घेण्याचे ठरले होते. त्यानुसार महेंद्र रूपने हा बसस्थानकावर आला आणि त्याने तक्रारदाराची भेट घेतली बसस्थानकाच्या कॅन्टीनमध्ये तक्रारदारास बसण्यास सांगितले गाडी पार्क करून येतो म्हणून गेला. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावल्याची शंका आली. महेंद्र रूपने याच्या हेतूवरून आणि एसीबीकडे सबळ पुरावे असल्यामुळे त्यांनी महेंद्र रूपने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक यू. के. जाधव यांच्या नेतृत्वात केली.