आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच पतीचा कारभारातील हस्तक्षेप थांबवा, मुख्‍यमंत्रांकडे निवेदनाद्वारे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सरपंचपती, सभापतीपती यांचा कारभारातील हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी स्वामी विवेकानंद फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 
 
निवेदनात मगर म्हणतात, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सत्तेचा सहभाग मिळावा यासाठी कायदा करुन आरक्षण दिले. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी ग्राम पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सरपंच, सभापती, नगराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. परंतु त्यांचे पती, जवळचे नातेवाईक त्यांच्या दालनात बसतात. रोजच्या कामामध्ये या लोकांचा अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप दिसतो. ही बाब चुकीची आहे. इतकेच नाही तर लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणणारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा वापर केवळ रबरस्टँपसारखा होणे खेदजनक आहे. या संदर्भात लक्ष घालण्यात यावे. तसेच गैरप्रकाराला आळा घालावा, असे मगर यांनी म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...