आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेप्युटी सीईओने १०,००० "खाल्ले' पोलिसांनी उलटे टांगून काढले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गृहकर्जमंजूर करण्यासाठी स्वीकारलेली दहा हजारांची लाच गिळण्याचा प्रताप अकोला जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी साेमवारी केला. इनामदारांनी इमानदारीने केलेली ही बेईमानी मात्र त्यांच्या घशाखाली उतरू शकली नाही. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घशात अडकलेले पाचशेच्या २० नोटांचे बंडल त्यांना उलटे टांगून अाणि पाठीवर बुक्क्या मारुन बाहेर काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात ही घटना घडली. विशेष म्हणजे, आजच राज्याच्या मुख्य सचिवांनी लाच घेतलेल्या प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला अाणि त्याची नोट या इनामदारांनीच तयार करून दिली होती.

तेल्हारा पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांचे एकूण ११ लाख २२ हजारांची गृहकर्जाची फाइल जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये गृहकर्ज मंजूर झाले होते. मात्र, जिल्हा परिषदेची अंतिम मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे ही फाइल सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने जावेद इनामदार यांच्याकडे आली. फाइल मंजूर करून देण्यासाठी इनामदार यांनी या दोघांना २५ हजार रुपये मागितले. २५ हजारांपैकी १५ हजार रुपये जुलै महिन्यात देण्यात आले. मात्र, तरीसुद्धा फाइलमध्ये त्रुटी काढून इनामदारांनी ती परत पाठवली. यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या अाठवड्यात ही फाइल परत इनामदार यांच्याकडे आली. फाइलवर सही करतो. पण, उर्वरित १० हजार रुपये लागतील, असा आग्रह इनामदार यांनी धरत हस्तकामार्फत निरोप दिला. शेवटी त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन येतो, असे सांगून लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. ठरल्याप्रमाणे इनामदार यांच्या कार्यालयातच कर्मचाऱ्यांकडून १० हजार रुपये घेऊन खिशात टाकलेे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीला जाण्यासाठी ते साडेपाच वाजता निघाले. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक उत्तमराव जाधव पथकातील कर्मचारी दबा धरून होते. त्यांनी लगेच पाठलाग करीत इनामदार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अटक उर्वरित.पान १२
केली.जावेद इनामदार मूळचे मिरज (जि. सांगली) चे रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंतर लगेच त्यांच्या शासकीय बंगल्याचीसुद्धा झडती घेतली.
^घटनेची माहिती विभागीय आयुक्त ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना देण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. एम.देवेंदरसिंह, सीईओ, अकोला.

लाचखोरांची यादीही दिली
विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या किती कर्मचाऱ्यांनी लाच घेतली याचा आढावा आज प्रधान सचिवांनी व्हीसीद्वारे घेतला. या प्रकरणाची माहितीसुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनीच तयार करून सीईओंकडे सादर केली.

१८ कर्मचारी जाळ्यात
जानेवारी २०१३ ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, दोन गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, लिपिक सर्वशिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकारी लिपिकवर्गीय १८ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

एक लाख जप्त, बंगला सील
^इनामदार यांना अटक केल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्यांच्या शासकीय बंगल्याची झडती घेतली. या वेळी लाख १०० रुपये रोख रक्कम सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय सर्व कागदपत्रांसह शासकीय बंगला सील करण्यात आला. उत्तमरावजाधव, पोलिस उपअधीक्षक, एसीबी.

उलटे टांगून पाठीत बुक्क्या...नोटा बाहेर
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी इनामदारला आपली अाेळख दिली. लगेच त्याने पाचशेच्या २० नोटांचे बंडल गिळले. नाेटांना पिन लावलेल्या असल्याने ते बंडल त्याच्या घशात अडकले. त्याने पाणी पिऊन ते घशाखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. पण ते आत जाईना. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला उलटे केले आणि त्याच्या पाठीत बुक्के मारले. अखेर त्यांना ठसका लागून नोटांचे बंडल बाहेर पडले.

इनामदारांची बेईमानी अडकली घशात!
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी डेप्युटी सीईओ इनामदारला आपली अाेळख दिल्यानंतर त्याने पाचशेच्या २० नोटांचे बंडल गिळले. नाेटांना पिन लावलेल्या असल्याने ते बंडल त्याच्या घशात अडकले.