आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी असतानाही लक्झरींची शहरातून वाहतूक; रस्ता सुरक्षा अभियानाचा फज्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - टप्पावाहतुकीस कायद्यानुसार बंदी आहे. असे असले तरी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लक्झरी बसेसचे थांबे आहेत. अशा थांब्यावर दररोज ५० च्यावर लक्झरी बसेस थांबत आहेत. हे नियमाला धरून नसल्याची कबुली राज्य परिवहन विभागाने देतो. मात्र अशा वाहनांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

एकीकडे राज्यभर राज्य परिवहन विभाग (आरटीओ) रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यातही त्याचे उद्घाटन सोमवारी झाले. मात्र सप्ताहादरम्यान सुद्धा प्रभावी कारवाया झालेल्या दिसून येत नाही. टप्पा वाहतुकीची परवानगी नसतानाही राजरोसपणे लक्झरी तून प्रवासी वाहतूक सुुरु आहे. विशेष म्हणजे अधिकारी -कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करून राज्य परिवहन खातेही (आरटीओ) याकडे कानाडोळा करते. त्याचा फायदा ट्रॅव्हल्स कंपन्या उचलतात. 

कंत्राटी टप्पा वाहतूकची मक्तेदारी 
महाराष्ट्रराज्यात शासनाने २९ नाेव्हेंबर १९७३ च्या अधिसूचनेद्वारे संमत केलेल्या या योजनेनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास कंत्राटी टप्पा वाहतूक सेवा पुरवण्यासाठी मक्तेदारी बहाल केली आहे. या योजनेतून काही घटकांना वगळण्यात आले आहे. यात राज्य परिवहन उपक्रमांचा समावेश आहे. महापालिका, नगर परिषद यांचा राज्य परिवहन उपक्रमांच्या व्याख्येत समावेश होतो. त्यामुळे इतर खासगी वाहनास टप्पा वाहतुकीस परवानगी नाही. 

आरटीओ कार्यालयासमोरच थांबतात लक्झरी 
अकोटकडे जाणाऱ्या लक्झरी बसेस बस स्थानक, टॉवर चौक आरटीओ कार्यालयाच्या समोरच खचाखच प्रवाशी बसवतात. राज्य परिवहन विभागाच्या कार्यालयासमोरच लक्झरी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी चढवल्या जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

काय आहे टप्पा वाहतूक 
दोनशहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या गाडीने त्या मार्गावर प्रत्येक गावात थांबून प्रवासी घेतल्यास ती टप्पा वाहतूक समजली जाते. खासगी लक्झरी चालकांना फक्त ‘पॉइंट टू पॉइंट’ सेवेची अर्थात एका गावाहून थेट दुसऱ्या गावापर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. टप्पा वाहतुकीवर बंदी असूनही खासगी बसेस खुलेआम एका शहरातून निघाल्यानंतर मार्गावरील प्रत्येक गावात बस थांबवून प्रवासी घेतात. 

लक्झरी बसेसला टप्पा वाहतुकीस परवानगी नाही 
टप्पा वाहतुकीची परवानगी लक्झरी बसेसला नाही. अशा बसेसवर कारवाई केल्या जाते. कारवाईसाठी मनुष्यबळचाही अभाव आहे. ज्यांना नॅशनल परमीट आहे. अशा लक्झरी बसेसला शहरातून धावण्याची परवानगी आहे- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.