आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवरी फाटा येथे रस्त्यावर पाणी साचलेलेच, नागरिकांसह वाहनधारक त्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवरी फाट्यावर रस्त्यावरच साचलेले पाणी. छाया: गणेश बोरचाटे - Divya Marathi
देवरी फाट्यावर रस्त्यावरच साचलेले पाणी. छाया: गणेश बोरचाटे
देवरी- दोन दिवसांआधी झालेल्या पावसामुळे अकोला ते अकाेट मार्गावर देवरी फाटा येथे मुख्य ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असून, या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आधी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणी काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाणी रस्त्यावरच साचलेले असल्याने केलेला खर्चही निकामी गेल्याचे वास्तव आहे. साचलेल्या पाण्यामुळे अत्यंत धोकादायक खड्डे निर्माण झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

अकोट-अकोला मार्गावर असलेल्या देवरी येथूनच शेगावकडेही मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावरील पाणी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. मार्गावरील उखडलेले दगडही गाडीच्या टायरमधून उखडून अनेक जखमी झाल्याने वाद निर्माण होत आहेत.
नालीबांधकाम गरजेचे
मार्गावरीलपाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम करणे गरजेचे ठरत आहे. पाणी साचले असता वारंवार सार्वजिक बांधकाम विभागाचे कर्मचारी येतात. मात्र, अद्यापपर्यंत ही समस्या निकालात काढण्यात आली नाही. नाल्या बांधण्यात याव्यात, अशी मागणी धंदेवाईकांसह प्रवासी करत आहेत.

ठोस निर्णय घ्यावा
साचलेलेपाणी निघून जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कुठल्याही प्रकारे ठोस निर्णय घेत नसून ही समस्या जैसे थे आहे. त्यामुळे दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तरी ही समस्या सोडवावी. '' अमितवानखडे, व्यावसायिक

समस्या सोडवावी
सार्वजनिकबांधकाम विभागाने समस्या कायमची सोडवावी. पाणी साचलेल्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम करून समस्या सोडवावी. '' डॉ.कैलास धुळे, देवरी