आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामे करताच नुकसान भरपाई द्या : मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अतिवृष्टीच्या नियमापेक्षा जास्त पाऊस झालेल्या भागात पंचनामा न करता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामा करून अहवाल सादर करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले कि, येत्या पाच वर्षात राज्यातील २१ गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील. यंदा पाऊस दमदार झाला असली तरी सर्वच जिल्ह्यांनी जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे सुरुच ठेवावीत.

घरकुल प्रमाणपत्रांचे वितरण: मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा सत्कार केला. सुवर्णानदी प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे, गट विकास अधिकारी एम.बी. मुरकुटे, तत्कालीन ठाणेदार अनिल जुमळे यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला. त्याचप्रमाणे मूर्तिजापूर बाळापूर येथील एकात्मिक घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. मूर्तिजापूर विभागातील पूजा बडोदे मिना धुरतकर, बाळापूर विभागातील मोहम्मंद हमीद मेहरूनीसा शेख कासम यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्तन कर्करोगाची तपासणी होईल. यामध्ये निदान झालेल्या तरुणींना ‘रेडीएशन फ्री’ यंत्राद्वारे सर्व उपचाराची जबाबदारी शासन उचलणार आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचा पालमंत्र्यांना हात, खासदारांची टाेलेबाजी : मुख्यमंत्र्यांनीखासदार संजय धाेत्रे यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी जात असलेल्या डाॅ. पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या बाजूने उभे करुन घेतले. त्यानंतर बाेलताना खासदार धाेत्रे यांनी काही गाेष्टी जाहीरपणे बाेलायच्या नसतात, असा टाेला लगावला. खासदारांच्या टाेलेबाजीला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर देत ‘काेणत्या गाेष्टींची जाहीरपणे वाच्यता करु नये’, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा अावश्यक : खासदार संजय धाेत्रे
जिल्ह्यात वीज पुरेशी उपलब्ध असून, वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा अावश्यक असल्याचे मत खासदार संजय धाेत्रे यांनी व्यक्त केले. त्यांनी शासनाच्या कामांचा गौरव करत अकोला विमानतळ, खारपाणपट्ट्यातील बॅरेजेस अकोला-खंडवा गेज परिवर्तनाचा मुद्दा मांडला. ब्राॅडगेजचा मुद्दा लवकर निकाली निघण्यासाठी प्रयत्न करु, असे अाश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना लवकर निधी : मंत्री महाजन

जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन यांनी दिली. राज्यात तीन वर्षांत सर्वच प्रकल्प पूर्ण हाेण्यासाठी ६५ हजार काेटी खर्च करण्यात येणार अाहेत. राज्यात नुकतेच अवयवदान अभियान राबवले. याबाबत जनजागृती आवश्यक आहे.
टेक्सटाईल पार्क अावश्यक:डाॅ. पाटील
कापूस उत्पादक पट्टा असलेल्या अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात पारसजवळ उपलब्ध असलेल्या जमिनीवर टेक्सटाईल्स हब निर्माण करण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी याप्रसंगी केली. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन आपल्या योजनांची आखणी करत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितिचा अभ्यास करून त्यांना आवश्यक असलेली मदत योजनांच्या माध्यमातून दिली आहे. वैद्यकीय उपचारासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. तसेच ७/१२ असलेल्या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात असलेल्या भुसभुशीत जमिनीसाठी वरदान असलेली ‘मागेल त्याला शेततळे’ योजना शासनाने अंमलात आणली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शहरात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासिकेचे नियोजन केले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...