आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायरियामुळे महिलेचा मृत्यू; सहा रुग्णांवर उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तालुक्यातील दहीगाव गावंडे येथे डायरियामुळे सारिका गजानन पुंडकर या महिलेचा मृत्यू झाला. गावात डायरियाची साथ लागल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गुरुवारी येथील सहा रुग्णांना उपचारार्थ भरती करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणा रुग्णांवर उपचार करण्यात हतबल झाली आहे.
दहीगाव गावंडे येथे आठवडाभरापासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. गावातील कोकिळा भोंड, जान्हवी भोंड, सुशीला दिवनाले, नेहा दिवनाले, वर्षा शरद इंगळे, ऋत्तिका विजय खंडारे, वच्छला दिवनाले, पवन गावंडे, दिनेश तळोकार हे नागरिक आजाराने बाधित असून उपचार घेत आहेत. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याची आेरड नागरिकांमधून होत आहे. साथीच्या आजाराची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी धाव घेत रुग्णांची पाहणी केली. यातील काही रुग्णांना पळसो बढे, तर काहींना सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. दहीगाव गावंडे येथे कार्यरत असलेला वैद्यकीय स्टॉफ नेहमीच अनुपस्थित असतात. त्यामुळे रुग्णांवर योग्यरीत्या उपचार होत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात काही गावांमध्ये डायरियाचे रुग्ण अाढळले अाहेत. अाराेग्य प्रशासनाने उपाययाेजना करण्याची गरज अाहे.
बातम्या आणखी आहेत...