आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल क्लास रुम झाल्या सज्ज; लवकरच लाेकार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गणेशाेत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देत जमा झालेल्या वर्गणीतून अादीवासी बहुल भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल क्लास रुम उभारण्याचा संकल्प पूर्णत्वास गेला अाहे. हा संकल्प युवाराष्ट्र परिवाराने सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून केला पूर्ण केला असून, लवकरच लाेकार्पण साेहळा अायाेजित करण्यात येणार अाहे. या संकल्पामुळे अाकाेट तालुक्यातील पाेपटखेड परिसरातील जनुना येथील शाळेतील विद्यार्थ्यांची उच्च, तंत्र शिक्षणाची वाट प्रकाशमय हाेणार अाहे. शैक्षणिक विषमता दूर व्हावा, या उद्दात्त हेतूने सुरु केलेल्या कार्याला समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावला अाहे.

गणेशाेत्सवात अनेक मंडळांनी मूिर्त, सजावट, लायटींग, वाजंत्री, मिरवणूक यावर लाखाे रुपयांचा खर्च केला. प्रत्यक्ष कृतीने सामजिक परिर्वतनाचा विडा उचलेल्या युवाराष्ट्र परिवार या संघटनेने यंदाचा गणेशाेत्सव खास पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला हाेता. गणेशाेत्सवासाठी गाेळा झालेल्या वर्गणीतून जास्तीत-जास्त बचत करावी बचतीतून जनुना येथील ‘आदीवासी अाणि कोरकू बाल गणनायकांसाठी डिजिटल क्लासरूमची उभारणी करण्याचा संकल्प ‘युवाराष्ट्र’ने केला. निरागस बालकांच्या स्वप्नांना पंख देण्याच्या कार्याला गणेशाेत्सवात प्रारंभ झाला. पहाता-पहाता अनेकांनी अार्थिक मदत केली. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या युवाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी स्वत: गावात जाऊन डिजिटल रुमची उभारणी करुन घेतली. ते स्वत:चही राबले. अाता लवकरच ही रुम विद्यार्थ्यांसाठी खुली हाेणार अाहे.

अशीअाहे डिजिटल क्लास रुम : जनुनायेथील या शाळेत १६७ विद्यार्थी असलेल्या या शाळेत चार वर्ग खाेल्या असून शिक्षक अाहेत. िडजिटल रुममध्ये संगणक, प्राेजेक्टर, माेठी स्क्रिन, इयत्ता ते ७वीचे साॅफ्टवेअर, हाेम थिएटर, मॅटीन, फॅनची व्यवस्था केली अाहे. रुमची रंगरंगाेटीही करण्यात अाली.
सामािजकपरिवर्तनात हवा सर्वांचा सहभाग : अादीवासीिवद्यार्थ्यांसाठी िडजिटल क्लास रुम उभारण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग असावा, यासाठी व्हॅट्सअॅप गृप तयार केला. समाजाला काही तरी देणं लागतं, अशी भावाना असलेल्या सदस्यांनी १०० ते १००० रूपये देणगी देण्यास प्रारंभ केला. या कार्यात अातापर्यंत ११० पेक्षा जास्त संवेदनशील व्यक्तिंनी सहभाग नाेंदवला अाहे. सध्या या प्रकल्पावर लाख रुपये खर्च झाला अाहे. प्रकल्पासाठी ७० हजार रुपयांचे याेगदान जाहीर झाले हाेते, मात्र सध्या ५० हजार रुपये गाेळा झाले. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात अाणण्याच्या या कार्यात समाजातील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, असे अावाहन युवाराष्ट्र परिवारातर्फे करण्यात अाले अाहे.

युवाराष्ट्रचे कार्य
युवाराष्ट्राने अातापर्यंत २०० पेक्षा शेतकरी कुटुंबीयांना स्वयंराेजगारासाठी मदत केली. २९ गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली. पातूर तालुक्यातील तांदळी येथे १५ फेब्रुवारीला डिजिटल क्लास रुमचे लाेकार्पण केले. राष्ट्रयुवातर्फे वर्षभर जलसिंचन, पर्यावरण रक्षण, वृक्षाराेपणसाठी उपक्रम राबवण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...