आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील-अामदार रणधीर सावरकर शाब्दीक वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - कालपर्यंत शीतयुद्ध सुरु असलेल्या पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील त्यांच्याच पक्षाचे भाजपचे अामदार रणधीर सावरकर यांच्यात रविवारी थेट शाब्दीक चकमक झाली. कॅफेटेरिया, मल्टी अाेपन जीमच्या लाेकार्पण साेहळ्यात दाेन्ही नेत्यांमध्ये प्राेटाेकाॅलवरुन वाद झाले. पालकमंत्र्यांनी अामदारांकडे पाहून, ‘काेणाशी बाेलताय तुम्ही’, असा प्रश्न केला. यावर अामदारांनी ‘काेण तुम्ही ?’ असा प्रतिसवाल उपस्थित केल्यानंतर हा राजकीय वाद आणखीच वाढत गेला.

जिल्ह्यात खासदार संजय धाेत्रे गट पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध लपून राहिलेले नाही. खासदार धाेत्रे यांचे भाचे असलेले अामदार रणधीर सावरकर अामदार गाेवर्धन शर्मा यांना खासदारांच्या गटाचे म्हणून अाेळखले जाते. दाेन्ही गट नाव घेता एकमेकांना टोले लगावण्याची एकही संधी साेडत नाहीत. पालकमंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र यांचे विश्वासू सहकारी म्हणूनच अाेळखले जाते. काही दिवसांपूर्वी सुपर स्पेेशालिटी हाॅस्पिटलचे भूमीपूजन अाणि विविध विकास कामांच्या लाेकार्पणानिमित्त अकाेल्यात अालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित खासदार धाेत्रे यांनी ‘काही गाेष्टी सर्वांसमाेर बाेलता येत नाही,’ असा टाेला लगावला हाेता. यावर मुख्यमंत्र्यांनीही भाषणातून खासदारांच्या मताशी वेगळ्या अर्थाने सहमती दर्शवली हाेती. शनिवारी पार पडलेल्या भाजपच्या पश्चिम विदर्भ कार्यकर्ता संमेलनातही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीतही खासदार धाेत्रे यांनी टाेलेबाजी करीत अामदारांचेही खाती तपासा, असे सूचविले हाेते.

दरम्यान, रविवारी कॅफेटेरिया, मल्टी अाेपन जीमच्या लाेकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील अामदार रणधीर सावरकर एकत्र अाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अामदार सावरकर यांनी एवढ्या वेळेवर कार्यकमाचे नियाेजन कसे केले, असा जाब क्रीडा अधिकाऱ्यांना विचारला. यावर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दाेघांतही शाब्दीक चकमक झाली. सावरकर यांनी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. त्यामुळे यानिमित्ताने खासदार पालकमंत्री यांच्या गटात थेट शाब्दिक चकमक उडण्याला प्रारंभ झाला असून, याचा अागामी पदवीधर, मनपा निवडणूक पक्ष संघटना बळकट करण्यावर परिणाम हाेणार की नाही, हे लवकरच स्पष्ट हाेणार अाहे.

सर्वांचीच धावपळ : कॅफेटेरिया,मल्टी अाेपन जीमच्या लाेकार्पण साेहळ्याचे निराेप प्रशासनाकडून रविववारी सकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींसह अनेकांना देण्यात अाले. त्यामुळे सर्वांचीच धावपळ झाली हाेती. काही जण साेहळा संपल्यानंतर तेथे पाेहाेचले.

हेथांबणार नाही? : जिल्‍ह्यात लाेकसभा, विधानसभेनंतर अाता नगराध्यक्ष नगरपालिका प्रभाग निवडणुकीतही भाजपला माेठे यश मिळाले. सध्या शहरात सुपर स्पेशॅलिटी हाॅस्पिटल, मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरण सिमेंट काॅंक्रिटीकरण जाेरात सुरु अाहे. सांस्कृतिक भवनाही कामही लवकरच सुरु हाेणार अाहे. जिल्ह्यातील २० रस्त्यांसाठी जवळपास ९० काेटी रुपये मंजूर झालेले अाहेत. शहरात एकईकडे विकासाची कामे सुरु असल्याचे दिसून येत असून, दुसरीकडे भाजपमधील कुरघाेडीच्या राजकारणाचा अालेखही उंचावत अाहे. त्यामुळे नेत्यांमधील मतभेदांचा परिणाम विकासावर हाेणार नाही, याची खबरदारी थेट मुख्यमंत्री आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी अकाेलेकरांमधून हाेत अाहे.
पालकमंत्र्यांशी माझे बोलणे झाले
मी तीन दिवसांपासून छत्तीसगड येथे अाहे. मला क्रीडा अधिकाऱ्यांंचा काल फाेन अाला हाेता. मात्र कार्यक्रम चार-पाच दिवसानंतर ठेवल्यास बरे हाेईल, असे सांगितले. कार्यक्रमाला खासदार संजय धाेत्रे उपस्थित राहिल्यास उचित हाेईल, असेही म्हणालाे. पालकमंत्री डाॅ. पाटील यांच्याशीही बाेलणे झाले. त्यांनाही हेच सांगितले. मात्र ते कार्यक्रम घेणे अावश्यक असल्याचे म्हणाले. यावर मी त्यांना ठिक अाहे,असे म्हणालो. -गाेवर्धन शर्मा, अामदार.

चुकीच्या पद्धतीवर बोलणारच
जिल्ह्यातीलअधिकारीपालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी १२/२४ तासांपूर्वी कार्यक्रमाचे नियाेजन केले. ऐनवेळी कार्यक्रम नियाेजनाची पद्धत चुकीची अाहे. चुकीच्या कार्यपद्धतीवर मी बाेलणारच. नव्हे ते माझे कर्तव्यच अाहे. यापूर्वीही अनेक वेळी असे प्रकार घडले अाहेत. हे सर्व किती दिवस सहन करायचे. जिल्हयात अनेक ज्येष्ठ लाेकप्रतिनिधीही अाहेत. त्यांनाही दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येताे- रणधीर सावरकर आमदार

अामदार गाेवर्धन शर्माशी चर्चा केली
जीमलाेकार्पणसाेहळ्याचे नियाेजन जिल्हाधिकारी कार्यालय क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले हाेते. राजशिष्टाचाराचे पालन करावे, अशा सूचना दिल्या हाेत्या. मी स्वत: अामदार गाेवर्धन शर्मांशी चर्चा केली. ते दाेन दिवस शहरात नसल्याने त्यांनी साेहळा अाटोपून घ्या, असे सांगितले. अाज कार्यक्रमावेळी मी शांतपणे अामदार सावरकर यांना मुद्दा समजावून सांगितला. विकासकामांत मी कधीच हेवेदाव्याचे राजकारण केले नाही -डाॅ. रणजित पाटील, पालकमंत्री.
असा रंगला पालकमंत्री-अामदारांमध्ये सामना
अामदार सावरकर :- लालाजी(अामदार गाेवर्धन शर्मा) नसतानाही कार्यक्रम घेऊन राहिले.
पालकमंत्रीडाॅ. पाटील :- जराहळू बाेला, काेणाशी बाेलताय तुम्ही?
अामदार :- काेण तुम्ही? काेणत्या अावाजात बाेलू? लालाजी नसतानाही उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्याची गरज काय हाेती? डिएसअाे, जिल्‍हाधिकार्यांना निराेप दिला हाेता.
पालकमंत्री :- काय झाले ?
अामदार :- लालाजी म्हणाले कि, मी नाही; तरीही कार्यक्रम ठेवला. पक्षाचे अामदार असतानाही कशाला ठेवला कार्यक्रम?
पालकमंत्री :- अापण बसून बाेलू शकताे?
अामदार :-अामचा असा अपमान कशाला करता?
पालकमंत्री :-सर्व प्राेटाेकाॅल पाळला असून, कायद्याने सर्व केले अाहे.
अामदार :-प्रेाटाेकाॅलचा काय संबंध? सध्याकाळी 7 वाजता निराेप यताे, ठिक सकाळी 9 वाजता कार्यक्रम अाहे. कार्यक्रम काही एका दिवसात ठरत नसताे.
बातम्या आणखी आहेत...