आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१ पराभूतांवर अपात्रतेची टांगती तलवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नुकत्याच पार पडलेल्या पाच नगरपरिषदांच्या निवडणुकीतील २१ पराभूत उमेदवारांना पुढील निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. आयोगाच्या निर्देशानुसार या उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च ठराविक वेळेत सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली असून, जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहेत. 
 
सर्व उमेदवारांना २६ डिसेंबर २०१६ च्या आत निवडणूक प्रचार खर्चाचा हिशेब सादर करावयाचा होता. मात्र, २१ उमेदवारांनी अद्यापही तो सादर केला नाही. निवडणुकीत ५५९ उमेदवार उभे होते. त्यापैकी ५३८ व्यक्तींनीच महिनाभराच्या आत खर्चाचा हिशेब सादर केला. इतर २१ जणांनी अद्यापही खर्चाचे तपशिल सादर केले नाही. सध्या या सर्व जणांची माहिती संबंधित नपच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या नात्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे पाठवली. त्यानुसार या सर्वांना नोटीस बजावल्या जाणार असून, त्यांचा जबाब ऐकूण घेतला जाईल. सर्वांवर किमान सहा वर्षांसाठी पुढील कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची कारवाई होऊ शकते. कायद्यात तशी तरतूदही आहे. 

मूर्तिजापूर, तेल्हारा ‘नील’ 
या निवडणुकीत मूर्तिजापूर नगरपरिषदेसाठी १३७ तर तेल्हाऱ्यात ७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्वांनी खर्चाचा हिशेब सादर केला आहे. यामध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांसह पराभूत उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान दोन्ही नगरपरिषदांमधिल सर्व उमेदवारांनी खर्च सादर केल्यामुळे या दोन्ही नगरपरिषदांमध्ये कारवाईचा प्रश्नच उरला नाही. 

बाळापुर, पातुरात प्रत्येकी व्यक्ती 
बाळापूर नगरपरिषदेसाठी ९७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ८८ जणांनीच खर्चाचे तपशिल सादर केले आहेत. पातुरात ८० उमेदवार होते. त्यापैकी ७१ जणांचा खर्च जिल्हा प्रशासनाकडे पोहोचला असून अकोटमध्ये १६७ पैकी १६४ जणांनी खर्च सादर केला आहे. अशाप्रकारे जिल्हाभरातील तीन नगरपरिषदांच्या २१ जणांनी प्रचार खर्चाचा हिशेब सादर केला नाही. 
प्रशासकीय