आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये 2 हजार १२३ "डिजिटल लॉकर' उघडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संग्राम कक्षात डिजिटल लॉकर उघडण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम.कुळकर्णी यांनी कामाची पाहणी केली.)
अकोला- संग्राम कक्षाचे जिल्हा समन्वयक तालुका समन्वयकांनी ‘डिजिटल इंडिया वीक’अंतर्गत आतापर्यंत हजार १२३ "डिजिटल लॉकर' उघडले आहेेत. यामध्ये शासकीय कर्मचारी १२०५ इतर ९१८ व्यक्तींचा सहभाग आहे.
डिजिटल इंडिया केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्य शासनानेदेखील सन २०१५ हे डिजिटलाइज्ड कालबद्ध सेवा वर्ष २०१५ म्हणून घोषित केलेले आहे. डिजिटल इंडियाचा भाग असलेला ‘डिजिटल इंडिया वीक’अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात आजपासून ग्रामीण भागात विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जात आहेत.
७, आणि जुलै, असे तीन दिवस जिल्ह्यात प्रत्येक गावात ग्रामसभा हाेणार असून, नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या विशेष ग्रामसभेमध्ये संग्राम व्हीएलई यांनी संग्राम ई-पंचायतअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या विविध अाज्ञावली, संग्राम केंद्रामधून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा, दाखले याबाबतची माहिती ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्व नागरिकांना देण्यात येत आहे. डिजिटल इंडिया वीकमध्ये डिजिटल लॉकर (संगणकीय लॉकर) ही संकल्पना अस्तित्वात आणण्यात आली असून, ही सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील १००९ गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवल्या जाणार आहे.

मूर्तिजापूर
पातूर
तेल्हारा
बार्शि-टाकळी
अकोट
बाळापूर
अकोला तालुका
जिल्हा परिषद
प्रत्येकाला ई-लॉकर देऊ
डिजिटलइंडिया उपक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला ई-लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय गाव ग्रामपंचायतीसंदर्भात माहिती अद्ययावत केली जात आहे.'' संजयतामसकर, जिल्हा समन्वयक, संग्राम कक्ष.
अशा आहेत सुविधा : नागरिकांनावेळोवेळी लागणारे सर्व दाखले महत्त्वाची कागदपत्रे उदा. जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट, शिक्षणविषयक दाखले, इत्यादींचे त्यांच्या वैयक्तिक संगणकीकृत लॉकरमध्ये ठेवण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. ही कागदपत्रे संगणकीकृत लॉकरमधून हवे तेव्हा हवे तेथे (Real time Basis) उपलब्ध होणार अाहेत. ही कागदपत्रे नागरिकांना स्वत:च्या संगणकीकृत लॉकरमध्ये ठेवण्याची पद्धती अत्यंत सोपी आहे.

१, ग्रामपंचायतीची माहिती, लोकसंख्या, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची नावे, त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाइल नंबर), कालावधी एरिया प्रोफाइलमधील अानुषंगिक प्रमाणित (Validated) माहिती, पंचायत पोर्टलमध्ये अद्ययावत प्रमाणात माहिती भरणे. २, लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरीमध्ये नमूद वॉर्ड, गट गण बरोबर आहे किंवा नाही, याबाबत अद्ययावत माहिती भरणे.

३, संग्राम सॉफ्टवेअरमध्ये ही माहिती अद्ययावत करणे. ४, सर्व नागरिकांचे डिजिटल लॉकर (संगणकीय लॉकर) उघडणे.