आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांनी मिळालेला निधी वेळेत खर्च करावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हावार्षिक योजनेतून मिळालेला पैसा यंत्रणांनी वेळेत खर्च करावा. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा निर्धारित करण्यासाठी लघुगटांची सभा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पार पडलेल्या बैठकीला आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अजय लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण कार्यालयीन यंत्रणांनी २३२ कोटी ३३ लाख रुपयांची मागणी केली. आराखड्यास्तव निधी वाटप सूत्रानुसार रुपये १०० कोटी २० लाख एवढी मर्यादा असल्याने सदर मर्यादेत विविध कार्यालयीन यंत्रणांच्या योजनांसाठी निधी प्रस्तावित करण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या पुढील बैठकीत मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. बैठकीत आराखड्याची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आजच्या बैठकीत ठरले. ज्या विभागांना वाढीव रक्कम हवी असल्यास त्यांनी प्रस्ताव तत्काळ जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बैठकीत ऑक्टोबर २०१५ अखेरील खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दृष्टिक्षेपात खर्च
२०१५-१६ अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार १३९ लाख कोटी रुपये एवढा होता. हा निधी पूर्णत: अर्थसंकल्पित होऊन प्राप्त झालेला आहे. कार्यालयीन यंत्रणांच्या मागणीनुसार त्यांना ६४.६५ कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला कार्यालयीन यंत्रणांनी माहे ऑक्टोबरअखेर ३३ कोटी ५५ लाख रुपये एवढा निधी खर्च केला आहे.