आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० हजार शेतकरी प्रगतीशील करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला -  शेतकऱ्यांचे हीत हा माझ्या कामकाजातील प्राथमिकतेचा विषय असून जिल्ह्यातील १० हजार कृषकांना प्रगतीशील करणे हा माझा संकल्प अाहे. त्यादृष्टीने आखणी सुरु असल्याचे स्पष्ट मत जिल्हािधकारी आस्तीककुमार पांडेय यांनी आज, गुरुवारी व्यक्त केले. 
जल्हािधकारी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर आज सायंकाळी पांडेय यांनी पत्रकारांशी संवाद सािधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. पत्रकारांकडून काही जाणून घेणे आणि माझे सिद्धांत तुम्हाला सांगणे, हा या आयोजनाचा विषय आहे, हे त्यांनी प्रथमदृष्ट्याच सांगून टाकले. त्यामुळे पांडेय यांची पत्रकार परिषद मनमुराद चर्चेने रंगली. 

जळगाव जिल्हा परिषदेत सीईओ आणि त्यापूर्वी गुजरात सीमेवरील नाशिक िजल्ह्याच्या कळवण येथे महसूल अधिकारी म्हणून केलेल्या कामांचा हवाल देत ते म्हणाले, १० हजार शेतकरी म्हणजे ५० हजार कुटुंबीय होतात. या सर्वांना प्रगतीशीलच्या श्रेणीत समाविष्ट करणे, हे माझे उद्दीष्ट आहे. 

या उद्दीष्टपुर्तीसाठी एक विस्तृत प्रकल्प तयार होत असून त्यासाठीचे प्राथमिक सर्वेक्षण डॉ. पंदेकृवि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खारपाणपट्टा आणि इतर भूभाग याचा उल्लेख करुन ते म्हणाले, या भागाची शेती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे हा प्रकल्प आव्हानात्मक असला तरी तो कठीण नाही. यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. योग्य नियोजन करुन त्या योजनांचे एकत्रीकरण करुन मी हे शक्य करणार आहे. 

‘जलयुक्तिशवार’मध्ये हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई : राज्यशासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांनाही त्यांनी महत्वाचे साधन मानले आहे. त्यांच्यामते जून २०१७ पूर्वी जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. तसे झाल्यास हयगय करणारे अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नफा हे प्रत्येक व्यवसायाचे सूत्र असते. त्यामुळे शेतीलाही तेच लागू असून हा व्यवसायसुद्धा नफ्याचा व्हावा, असा माझा प्रयत्न राहणार आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटीलही उपस्थित होते. 

शेततळ्यांना मनरेगातून १५ हजार : शासनाने‘मागेल त्याला शेततळे’ अशी योजना सुरु केली आहे. परंतु त्यासाठीचे अनुदान केवळ ५० हजार रुपये आहे. ही रक्कम तोकडी असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी कमी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी १५ हजार रुपयांचे अनुदान वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. मनरेगाच्या माध्यमातून ही बाब पूर्णत्वास जाणार आहे. 
खारपाणपट्ट्यात लवकरच दौरा : लवकरचखारपाणपट्ट्याचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उद्योग वाढीसाठीही प्रयत्न सुरु 
अकोलाजिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास असल्यामुळे येथे भरभराट नाही, हे स्वत:चे निरीक्षण नोंदवून त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाला दुय्यम दर्जा दिला. त्यांच्यामते त्यासाठी आधी उद्योग वाढवू. उद्योजक आणि संबंधित खात्याचे अधिकारी यांच्याशी हा विषय चर्चीला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अकोल्यात व्यवस्थापन कौशल्य िशकविणारी संस्था (एमबीए) आणणार असल्याचा मनोदय व्यक्त करुन त्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊ, हेही स्पष्ट केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...