आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि‍ल्हा परिषद वेळेवरील विषयांवरून सभेत खडाजंगी, शि‍वसेना सदस्यांनी धरले धारेवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभेत सत्ताधारी- विराेधकांमध्ये खडाजंगी झाली. - Divya Marathi
सभेत सत्ताधारी- विराेधकांमध्ये खडाजंगी झाली.
अकाेला - जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वेळेवर अालेल्या विषयांवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये प्रचंड खडाजंगी झाली. स्थायी समितीच्या सभेप्रमाणेच सर्वसाधारण सभेतही जवळपास २१ विषय मंजुरीसाठी सभेत ठेवण्यात अाले. मात्र विषय सूचीवर एकही विषय नमूद करता एवढ्या माेठ्या प्रमाणात वेळेवर विषय का ठेवण्यात अाले, असा सवाल शिवसेना सदस्य तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी अाक्रमकपणे उपस्थित केला. यावर सत्ताधारी भारिप-बमंसच्या सदस्यांनी अध्यक्षांना कितीही विषय वेळेवर मांडण्याचा अधिकार अाहे, असा दावा केला. यावरुन वि‍राेधक-सत्ताधारी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. या गदाराेळातच विषय मंजूर करण्यात अाले. मात्र या गोंधळामुळे तीन वेळा कामकाज ठप्प झाले हाेते.
जून महिन्यात पार पडलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भारिप-बमसंला पराभूत करण्यासाठी भाजप-शिवसेना-काँग्रेस अपक्षांची महाआघाडी तयार करण्यात अाली. मात्र भारिप-बमंसने शिवसेनेचे दाेन सदस्य फाेडल्याने महाअाघाडीचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने विराेधक चांगलेच अाक्रमक झाले. मात्र त्यानंतर अनेक सभांमध्ये विराेधकांचा अावाज क्षिण झाल्याचे दिसून अाले.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मात्र विराेधक विशेषतः शिवसेना प्रचंड अाक्रमक हाेती विषयसूचीवरील १४ सप्टेंबरच्या सभेचे इतिवृत्त मंजूर करणे या व्यतिरिक्त एकही विषय नव्हता. हा विषय मंजूर झाल्यानंतर एका पाठोपाठ एका विषयाला गतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला. या प्रकाराला शिवसेना सदस्य तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला. त्यांनी थेट अध्यक्षांच्या समोरील भागात धाव घेतली. त्यांनी नियमानुसार प्रत्येक विषयाची सूची तयार करुन त्यानुसार विषय वाचून दाखवा अाणि चर्चा करा, अशी मागणी त्यांनी केली. यावर भारिप-बमसंचे सदस्य दामाेदर जगताप यांनीही अध्यक्षांच्या समोरील जागेत धाव घेत देशमुख यांना जागेवर बसण्यास सांगितले. यावर अध्यक्ष संध्या वाघाेडे यांनी सर्वांनाच अपापल्या जागेवर बसण्यास सांगितले. यानंतरही तीन वेळा सत्ताधारी विराेधकांमध्ये अशीच शाब्दिक चकमक उडाली. अखेर दाेन्ही बाजूचे सदस्य शांत झाले. सभेला उपाध्यक्ष जमीर उल्ला खान, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, कृषि सभापती माधुरी गावंडे, समाजकल्याण सभापती रेखा अंभाेरे, महिला बाल कल्याण सभापती गाेदावरी पाताेंड, भाजपचे रामदास लांडे, विराेधी पक्ष नेते रमण जैन यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईअाे) अरूण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) व्ही .के. खील्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस.एम. कुलकर्णी यांच्यासह विभागप्रमुख, गट विकास अधिकारी इतर अधिकारी उपस्थित हाेते.

असेझाले वार-पलटवार : जिल्हापरिषदेच्या बुधवारी झालेल्या सभेत िवराेधकांचे अस्तित्व खऱ्या अर्थाने जाणवले. शिवसेना सदस्य नितीन देशमुख यांनी वेळेवर अाणलेल्या िवषयांवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत तुमच्या घरच्या कारभाराप्रमाणे सभागृह चालवू नका, लाेकशाही पद्धतीने कारभार केल्यासच सभागृहाचे कामकाज हाेऊ देऊ, अशा शब्दात सुनावले. यावर भािरप-बमसंचे सदस्य दामाेदर जगताप यांनीही चाेख उत्तर देत दादागिरीने वागणे याेग्य नसून, अाक्रमक अाम्हालाही हाेता येते, असे ठणकावून सांगत विराेधकांच्या वागणुकीचा िनषेधही केला. यावर देशमुख यांनी पलटवार करीत अाम्ही सत्ताधाऱ्यांचा निषेधाला जुमानत नसल्याचेही यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेना सदस्या तथा गटनेत्या ज्याेत्सना चाेरे, महादेवराव गवळे हेही अाक्रमक झाले. सभागृहात काेणतेही विषय िरतसर ठेवल्यास पाठिंबाच देण्यात येईल. मात्र लाेकशाही पद्धतीने निर्णय हाेत नसल्यास अाणि मनमानी करीत असल्यास त्याला चाेख उत्तर देऊ, असेही देशमुख यांनी ठणकावले.

नितीन देशमुख यांची टाेलेबाजी
शिवसेनानेते नितीन देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांकडे पाहून प्रचंड टाेलेबाजी केली. त्यांच्या प्रश्नांना सदस्य दामाेदर जगताप, गाेपाल काेल्हेच उत्तर देत हाेते. सभागृहात गाेंधळ का हाेताे, याचा सत्ताधाऱ्यांनी िवचार करावा असे म्हणत अध्यक्षांना उत्तर देऊ द्या, घाबरतात काय, असा खाेचक सवालही त्यांनी केला. प्रत्येक विषयासाेबत िटप्पणी अावश्यक असते. मात्र ना िटप्पणी ना तपशील असे कसे सभागृहाचे कामकाज करता, सभापतींनीच उतर द्यावे, असेही ते म्हणाले. सभागृहात िवषय मंजुरीसाठी दामाेदार जगताप हेच पुढाकार घेत हाेते. त्यामुळे ज्याेत्सना चाेरे, महादेवराव गवळे यांनी दामाेदर जगताप यांना तुम्ही बाेलू नका, अध्यक्षांना उत्तर देऊ द्या, अशा शब्दात शांत केले.

पावती तपासताच देयक केले अदा
टि‍नपत्र्यांचे वजनाची पावती तपासताच देयक अदा करण्यात अाले, असा मुद्या वि‍राेधीपक्ष नेते भाजपचे रमण जैन यांनी उपस्थित केला. काेटींचे टि‍न लाभार्थ्यांसाठी खरेदी केले. टि‍न पत्र्यांचा दर्जा कसा हाेता, याची पडताळणी झाली नाही. तक्रार केल्यानंतरही देयक अदा करण्यात अाले. केवळ अार्थिक देवाण-घेवाणीतून देयक अदा केल्याचा अाराेप जैन यांनी केला. अनेकांनी टि‍न परस्पर िवकल्याचेही ते म्हणाले. यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार यांनी पुरवठादाराची अनामत रक्कम जि‍.प.कडे असून, चाैकशी करुन वसूल करण्यात येईल, असे सांगितले.त्यानंतर विविध विषयांवर विराेधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. तसेच मनमानी पध्दतीने कारभार करू नका, अशा शब्दात विराेधकांनी सुनावले.

देशमुखांचा अाक्षेप
एका पाठोपाठ एका विषयाला गतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला. या प्रकाराला शिवसेना सदस्य तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला. त्यांनी थेट अध्यक्षांच्या समोरील भागात धाव घेतली.

शिक्षण समितीने जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीसाठी दीड काेटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यानुसार िनयाेजन केले. हा ठराव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात अाला. मात्र काेणत्या गावातील किती शाळांचे अंदाजपत्रक अाले, किती रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली, दुरुस्ती तपशील कुठे अाहे, अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार शिवसेना सदस्य नितीन देशमुख यांनी केला. त्यांनी समितीच्या सचिवाला नव्हे तर शिक्षण सभापतींनीच उत्तर द्यावे, असा अाग्रह धरला. सभापतींच्या उत्तराने देशमुख यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ते अाक्रमक झाले हाेते. शाळानिहाय अंदाजपत्रकाची माहितीच सभागृहात वाचून दाखवण्यात अाली नाही. सभापती केवळ अाक्षेप असल्यास नेमकेपणाने सांगावे, असा मुद्दा उपस्थित करीत राहिले.
बातम्या आणखी आहेत...