आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप की महाअाघाडी? महाअाघाडीची वाट खडतर, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ताधारी भारिप-बमसं अाणि भाजप, शिवसेनेने महाअाघाडीचा घाट घालत कंबर कसली अाहे. सत्ता स्थापन करणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष काेणती भूमिका घेतात, यावर अवलंबून अाहे.
महाअाघाडीचा नेताही ठरेना : भारिप-बमसंलासत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेनेने महाआघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असले तरी, महाअाघाडीचा नेताच ठरलेला नाही. अापले जास्त सदस्य असल्यानंतरही अपक्ष उमेदवाराच्या पदरात अध्यक्ष-उपाध्यक्षपद का टाकावे, असा प्रश्न भाजप-शिवसेनेच्या ज्येष्ठ सदस्यांना पडला अाहे. मात्र, शिवसेना-भाजपला सत्ता स्थापनेसाठी सहा सदस्यांची अावश्यकता असून, जाेही सदस्यांची जुळवा-जुळव करेल, त्याच्या गळ्यात पदाची माळ पडेल, असाही सूर अाहे.

सभापतीपदाचे गाजर : भारिप-बमसंलासत्ता स्थापन करण्यासाठी केवळ दाेनच सदस्यांची अावश्यकता भासणार अाहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठीच्या इच्छुकांवर काँग्रेस, राकाँ, अपक्षांना विश्वासात घेण्याची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. काँग्रेस, राकाँ अथवा अपक्ष यांच्यापैकी दाेन सदस्यांना सभापतीपद देऊन सत्ता स्थापन केली जाऊ शकते, अशी शक्यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त करण्यात येत अाहे.

शिवसेना नेत्यांचे रात्री अागमन : खासदारअरविंद सावंत यांचे रात्री उशिरा अकाेल्यात अागमन हाेणार अाहे. ते गुरुवारी सकाळी शिवसेना पदाधिकारी सदस्यांशी चर्चा करणार अाहेत. त्यानंतर पुढील निर्णय हाेणार अाहे.

माेट बांधणार काेण?
महाअाघाडीलासत्ता स्थापन करणे अवघड अाहे. बुधवारी रात्री काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये पाठिंब्याबाबत चर्चा झाली. महाअाघाडीची माेट बांधण्याची जबाबदारी काेणाची, समन्वयकाची भूमिका काेण निभावणार, शिवसेना भाजप या दाेघांमध्ये ‘माेठ्या’ भावावरून वाद झाल्यास कारभार कसा चालणार, असे प्रश्न काँग्रेस सदस्यांना पडले. त्या तुलनेने २४ सदस्य असलेल्या भारिप-बमसंमध्ये एकच नेतृत्व असल्याने अाेढाताण हाेणार नाही, असे काहींचे मत हाेते.

काँग्रेसला माेठ्या पदाची अपेक्षा : भारिप-बमसंकाँग्रेसने एकत्र येऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली. सदस्य संख्या लक्षात घेता काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळता सभापतीपदावर समाधान मानावे लागले. उर्वरित कालावधीसाठी तरी उपाध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा काँग्रेसची अाहेे.

अकाेला पंचायत समितीत शिवसेना-भाजप उमेदवारांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी वाशीम झेडपीत सत्ता स्थापनेत काँग्रेस-राकाँ विरुद्ध भाजप-शिवसेना अशी लढत झाली. त्यात काँग्रेस-राकाँ जिंकले. अकाेला झेडपीत काँग्रेस-राकाँ भारिप-बमसंला पाठिंबा देते की महाअाघाडीला साथ देते, हे उद्या स्पष्ट हाेईल.

बातम्या आणखी आहेत...