आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रशासकीय हालचालींना वेग, राजकीय नेते लागले कामाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मीनी विधानसभेची निवडणूक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण मतदार क्षेत्रानुसार राजकीय नेते कामाला लागलेले दिसत आहे. जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती गणाचे आरक्षण बदल्यावरही इच्छूक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत असून काही इच्छुकांनी श्रेष्ठींच्या आदेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. तर पालिका निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पालिका निवडणुका पाठोपाठ आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यासाठी राजकीय पक्षांची चाचपणीला सुरुवात केली आहे. तर काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण मतदार क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील जामोद मध्ये जामोद मतदार संघ सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी, वडशिंगी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. आसलगाव मतदारसंघ सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. पिंपळगाव काळे मध्ये पळशी सुपो, पिंप्री खोद्री, खांडवी, पळशी वैद्य, आडोळ बु., मांडवपा, तिव्हडी, आजमपूर, दादुलगाव, हिंगणे बाळापूर, पिंपळगाव काळे, मानेगाव, झाडेगाव, गोळेगांव बु, गोळेगांव खु, टाकळी पारस्कर असून ना. मा. प्र. साठी राखीव आहे.
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी, बावनबीर ना. मा. प्र. स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. पळशीझाशी मध्ये कवठळ, पेसोडा, चौठी, रुघाना, वकाना, काकोडा, बोडखा, निरोड, पिंप्री काथरगांव, पळशी झाशी, तामगांव, धामणगांव, चांगेफळ खु, करमोडा, मारोड, अकोला बु. यांचा समावेश असून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पातुर्डा बु. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. शेगाव तालुक्यातील आळसणा मतदारसंघात २१ गावे असून मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. माटरगांव बु. मतदारसंघ सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. चिंचोली कारफार्म अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे.
नांदुरा तालुक्यातील निमगांव मतदार संघामध्ये पातोडा, अलमपुर, दहिगांव बेलाड, येरळी, दादगांव, रामपुर, भुईशिंगा, आंबोडा, भोटा, हिंगणा भोटा, निमगाव, नारखेड, अवधा बु. या गावांचा समावेश असून ना. मा. प्र. साठी राखीव आहे. दहिवडी मतदार संघ सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. चांदुर बिस्वा ना. मा. प्र. साठी राखीव आहे. वडनेर भोलजी सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. मलकापूर तालुक्यातील नरवेल मतदार संघ सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी, देवधाबा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, दाताळा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. कोथळी सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग, धामणगांव बढे अनुसूचित जाती प्रवर्ग, तर राेहिणखेड ना. मा. प्र. स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. तसेच मेहकर तालुक्यातील घाटबोरी ना. मा. प्र., डोणगाव ना. मा. प्र., जानेफळ ना. मा. प्र. स्री, देऊळगाव माळी सर्वसाधारण प्रवर्ग, अंजनी बु. ना. मा. प्र., सोनाटी ना. मा. प्र. स्त्री साठी राखीव आहे. चिखली तालुक्यातील उंद्री मतदार संघ सर्वसाधारण, अमडापूर सर्वसाधारण स्त्री, इसोली नामाप्र स्त्री, सवणा सर्वसाधारण प्रवर्ग, केळवद अनुसूचित जाती स्त्री, मेरा खु. अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. मेरा बु. नामाप्र स्त्री, प्रवर्गासाठी राखीव आहे. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट नामाप्र, सावळा नामाप्र, साखळी बु. सर्वसाधारण प्रवर्ग, मासरुळ नामाप्र स्त्री, धाड सर्वसाधारण स्त्री, रायपूर सर्वसा.स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. देऊळगाव राजा तालुक्यात देऊळगाव मही मतदार संघ सर्वसाधारण, सिनगांव जहाँगिर अनुसूचित जाती स्त्री, सावखेड भोई सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा मतदार संघ सर्वसाधारण, शेंदुर्जन सर्वसाधारण, दुसरबीड अनुसूचित जाती स्त्री, सावरगाव माळ सर्वसा.स्त्री राखीव आहे. सोनोशी अनुसूचित जाती, लोणार तालुक्यातील सुलतानपूर नामाप्र स्त्री, किनगाव जट्टु सर्वसाधारण, पांग्रा डोळे अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे.

खामगाव तालुक्यात चुरशीचा सामना
खामगाव तालुक्यातील जि. प. निवडणूक यावर्षी चुरशीची ठरणार आहे. येथे माजी आ. दिलीपकुमार सानंदा तसेच कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यात सामना रंगणार आहे. या तालुक्यातील सुटाळा बु. सर्वसाधारण स्त्री, घाटपुरी सर्वसाधारण स्त्री, अटाळी अनुसूचित जाती स्त्री, अंत्रज अनुसूचित जाती, पिंपळगाव राजा सर्वसाधारण, कुंबेफळ सर्वसाधारण स्त्री, तर लाखनवाडा सर्कल अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे.

जोरदार रस्सीखेच
नुकत्याचपार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीमध्ये सत्तारूढ भाजप शिवसेना पक्षाला चांगले यश मिळाले तर विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. आता जि. प. निवडणुकीमध्ये विजेतेपदासाठी चारही प्रमुख पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...