आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईअाेंना दिले निवेदन; सदस्यांची मध्यस्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील प्रस्ताव दिलेल्या ग्रामपंचायतमध्ये अापले सरकार सेवा क्रेंद उभारण्यात यावे, यामागणीसाठी शुक्रवारी अकाेला जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने जिल्हा परिषदमध्ये धाव घेतली. सेवा केंद्र सुरु करण्यासाठी पातूर तालुक्यातील प्रस्ताव अालेल्या ग्रामपंचायतमध्ये केंद्र सुरु करा, असे संटघटनेचे म्हणणे हाेते. यासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी संघटनेकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे यांच्याशी चर्चा केली.
पंचायती राज संस्थांच्या काराभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसुत्रता पारदर्शकता अाणण्यसााठी सध्या केंद्र राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत अाहेत. ग्रामस्थांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत अावश्यक असलेली सेवा दाखले, व्यावसाियक सेवा गावातच कालबध्द स्वरुपात मिळावी, यासाठी अापले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने अाॅगस्ट महिन्यात घेतला हाेता.

केंद्रात मिळतील या सेवा : अापलेसरकार सेवा केंद्रातून ग्रामस्थांना शासनाच्या विविध विभागांतर्फे मिळणाऱ्या सेवासह संगणीकृत दाखले, प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार अाहे. यामध्ये जन्म नाेंदणी प्रमाणपत्र, मृत्यूची नाेंदणी प्रमाणपत्र, रहिवासाचा दाखला प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नाेकरी व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र प्रत, नादेय प्रमाणपत्र, बेराेजगार प्रमाणपत्र, वीज जाेडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, काेणत्याही याेजनेचा फायदा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, शाैचालय दाखला, जाॅब कार्ड, बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र, नळजाेडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र, निराधार याेजनेसाठी वयाचा दाखला दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र हयातीच्या दाखल्याचा समावेश अाहे.

कमीउत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतींना घ्यावी लागणार जबाबदारी : १५लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायती केंद्रासाठी उत्सूक असल्यास त्यांना केंद्रासाठाची अार्थिक जबाबदारी घ्यावी लागणार अाहेे. १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपचायतींचा गट तयार करण्यात येणार अाहे. भाैगाेलिक परिस्थिती ग्रामपंचायतींची अार्थिक क्षमता लक्षात घेऊन गट तयार करण्यात येणार अाहेत. १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींनी एकापेक्षा जास्त अापले सरकार केंद्राची मागणी केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करुन मान्यता देण्याचा निर्णय घेणार अाहेत.

अशा अाहेत जिल्ह्यातील ग्रामपंचायती : १५लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अापले सरकार सेवा केद्र उभारण्यात येणार अाहे. जिल्ह्यातील सन २०१६-१७च्या अंदाजपत्रानुसार १५ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या २११ अाहे. तालुकािनहाय ग्रामपंचायतींची माहिती पुढील प्रमाणे अाहे.

प्रस्ताव केले सादर : जिल्ह्यातीलअनेक ग्रामपंचायतींनी सेवा केंद्र सुरु करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीला सादर केल्याचे संघटनेचे सीईअाेंना दिलेल्या निवेदनात नमूद केले अाहे. मात्र हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद प्रशासानाकडे पाठवण्यात अाला नाही. त्यामुळे पंचायत समितीकडून प्रस्ताव मागवून केंद्र सुरु करण्यात यावे, असेही संघटनेने निवेदनात नमूद केले अाहे.
ग्रामाेद्याेजकची हाेणार केंद्रचालक म्हणून निवड
अापले सरकार सेवा केंद्रात ग्रामपंचायतींद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा अाॅन लाईन करणे, रजिस्टर िडजिटाईज्ड अाॅनलाईन करण्यात येणार अाहे. केंद्राचे व्यवस्थापन एका कंपनीमार्फत करण्यात येणार अाहे. यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रामाेद्याेजकची केंद्रचालक म्हणून निवड करण्यात येणार अाहे. ग्रामाेद्याेजकची हाेणार केंद्रचालक म्हणून निवड
बातम्या आणखी आहेत...