आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षांवर संतापले सदस्य, सेना, भाजपच्या सदस्यांचे आरोप-प्रत्यारोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नेहमी प्रमाणे उशिरा सुरू होणारी जिल्हा परिषदेची सभा शुक्रवारी तीन तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे सेना, भाजपच्या सदस्यांनी अध्यक्ष शरद गवई यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र रोष व्यक्त करत त्यांना धारेवर धरले. यामुळे काहीवेळ सभागृहात तणावाचे वातावरण होते.
राजर्षी शाहू महाराज सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २७ नोव्हेंबरला झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई होते. या वेळी उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, महिला बालकल्याण सभापती दौपद्राबाई वाहोकार, समाजकल्याण सभापती गोदावरीताई जाधव, कृषी पशुसंवर्धन समिती सभापती रामदास मालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवंेंदर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सचिव के. आर. तापी यांच्यासह समाजकल्याण अधिकारी माया केदार, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. दुपारी वाजतापासून सर्व सदस्य अध्यक्षांची वाट पाहत बसले होते. अध्यक्ष शरद गवई नेहमीप्रमाणे उशिरा आले. त्यामुळे सदस्यांनी उशिरा येण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीची आचारसंिहता लागली अाहे. त्यामुळे सभेत धोरणात्मक निर्णय घेता किमान चर्चा तरी व्हावी, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. मात्र, अध्यक्षांनी आचारसंहितेचे कारण पुढे करत सभा घेण्यावरच प्रश्न उपस्थित केला. मात्र, निर्णय नका घेऊ, पण किमान चर्चा तर करा, असा सवाल सदस्य चंद्रशेखर पांडे, राजेश खोने, विरोधी पक्ष नेता रमण जैन यांनी उपस्थित केला. त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान, आचारसंिहतेबाबत सचिव के. आर. तापी यांचे अज्ञान दिसून आले. त्यामुळे सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी चुकीची माहिती दिली, तर लक्षात ठेवा, असे म्हणत दम दिला.
अध्यक्षांचेदरवेळचे नाटक, विरोधी पक्षनेत्यांचा आरोप: सभेलाउशिरा येण्याचे अध्यक्ष शरद गवई यांचे दरवेळचेच नाटक असल्याचा अारोप विरोधी पक्ष नेते रमण जैन यांनी केला. आचारसंहिता लागू असल्याचे आम्हालाही माहीत आहे. इंग्रजित सांगू नका आम्हाला समजत नाही, असे म्हणत आचारसंहितेदरम्यान नेमके काय करता येत नाही, याचा खुलासा करावा, अशी सूचना रमण जैन यांनी केली.

इतिवृत्तावर स्वाक्षरी करण्याचा पडला विसर : सप्टेंबर२०१५ च्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावर स्वाक्षरी करताच हे इतिवृत्त सभागृहातील सदस्यांना देण्यात आले. इतिवृत्तावर सही करण्याचा विसर अध्यक्षांना पडल्याचे निदर्शनास अाल्याने सदस्य नितीन देशमुख यांनी त्यांना धारेवर धरले. त्यांच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर अध्यक्ष देऊ शकले नाहीत.

पाणीटंचाईच्यागावांची माहिती तयार, पाणीप्रश्नावर चर्चा नाही : जिल्ह्यातसध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान या विषयावर तरी चर्चा करा, अशी सूचना सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी मांडली. पाणीटंचाईच्या गावांची माहिती तयार आहे, आपण कक्षात यावे, आपणास माहिती दिली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी म्हटले.
विषय बारगळले :
१.सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे.

२. जिल्हा परिषदेचा सन २०१४- १५ मध्ये झालेल्या वार्षिक जमा खर्चास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणे.
३. प्राथमिक आरोग्य केंद्र कावसा ता. अकोट येथील मुख्य इमारत शिकस्त करणे नवीन मुख्य इमारत बांधकाम प्रस्तावित करण्यासाठी सभेची मंजुरी.

कारवाई होणारच
शौचालयाचे अनुदान वितरित करण्यास दिरंगाई करणाऱ्या बीडीओंवर कारवाई होणार आहे. सदस्य राजेश खोने पातूरच्या परिस्थितीबाबत माहिती देत बीडीओ अनुदान वाटपात टाळाटाळ करत असल्याचे सांगितल्यानंतर हा निर्णय घेतला.

विरोधाभासी प्रकार
स्वच्छतामिशन जिल्हा परिषदेमार्फत राबवले जात आहे. कोट्यवधींच्या मिशनवर खर्च होतो. मात्र, तरीसुद्धा बीडीओंच्या निष्काळजीपणामुळे शौचालय बांधकामासाठीचा निधी वितरण करण्यात दिरंगाई होत आहे. हा प्रकार विरोधाभासात्मक असल्याचा आरोप सदस्य राजेश खोने यांनी केला.

बीडीओंचे नाही लक्ष
बीडीओंचे कामात लक्ष नसून, केवळ टाळाटाळ करत असल्याचा सूर सभागृहात सदस्यांनी काढला. पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना बोलावले असता ते अनुपस्थित होते. बीडीओ डॉ. डी. एस. बचुटे यांनी उभे राहून त्यांना बोलावण्याचे नाटक केले.