आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरावावरून सत्ताधारी-विराेधक अाता येणार अामने-सामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभेत दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत घेण्यात अालेल्या ठरावावरून सत्ताधारी विराेधकांमध्ये सामना रंगण्याचे संकेत प्राप्त झाले अाहेत. सभापतींच्या मते हा ठराव घेण्यात अाला असून, ठरावच मंजूर झाला नसल्याचा दावा विराेधक असलेल्या शिवसेना सदस्यांनी केला अाहे. त्यामुळे सुमारे साडे तीन काेटी रुपयांची याेजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. परिणामी अधिकारी-कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता अाहे.
दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत निधीच्या नियाेजनासाठी १६ अाॅगस्टला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा अायाेजित केली हाेती. दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत सन २०१५-१६ साठी एकूण २१ काेटी ९५ लाख ४४ हजार ५८० रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. अनुसूचित जातीच्या लाेकसंख्येच्या प्रमाणात तालुकानिहाय निधी मंजूर केला हाेता. त्यानंतर अखर्चित राहिलेल्या तालुक्याचा निधी इतर तालुक्यांमध्ये वळता करण्याची मागणी शिवसेना सदस्य महादेवराव गवळे यांनी केली. यावर यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे अावश्यक असल्याचे मत सभेचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुलकर्णी यांनी व्यक्त केले हाेते. त्यानुसार पुढील सभेत यावरचर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. मात्र, नंतर अकाेला, बाळापूर तेल्हारा तालुक्यातील कामांसाठी निधी मंजूर करण्याचा ठराव घेतल्याचे इतिवृत्तामध्ये ठराव क्रमांक मध्ये नमूद केले. ही बाब लक्षात येताच साेमवाारी महादेवराव गवळे, जि. प. सदस्य तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, गाेपाल दातकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईअाे) अरुण विधळे यांच्याकडे धाव घेऊन कार्यवाहीची मागणी केली. यानुसार सीईअाेंनी अधिकाऱ्यांना फाईल सादर करण्याचा अादेश दिला हाेता.

असाघेतला ठराव
१६ अाॅगस्टच्या इतिवृत्तानुसार सभेत दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत ठराव क्रमांक मध्ये कामांना मंजुरी देण्यात अाली. यामध्ये अकाेला तालुक्यासाठी काेटी २० लाख रुपयांच्या २६ कामांना मान्यता दिली. ही कामे १६ गावांमध्ये करण्यात येणार अाहेत. तेल्हारा तालुक्यासाठी ९७ लाख ३९ हजार रुपयांच्या १५ कामांना मान्यता प्रदान केली. ही कामे १३ गावांमध्ये करण्यात येणार अाहेत. बाळापूर तालुक्यासाठी काेटी ८१ लाख रुपयांच्या २३ कामांना मान्यता देण्याचा ठराव मंजूर केला. ही कामे १७ गावांमध्ये करण्यात येणार अाहेत. तसेच बाळापूर तालुक्यासाठीचा अखर्चित निधी ७४ लाख ४७ हजार रुपये अन्य तालुक्यात वळता करण्यासाठी शासनाची परवानगी घेण्याचा ठराव मंजूर केला.

म्हणेरात्री स्वाक्षरी केली
समाज कल्याण समितीच्या सभेला सदस्य सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. कुलकर्णी उपस्थित हाेते. इतिवृत्तावर त्यांनी स्वाक्षरीही केली. सूत्रांनी दिलेल्या मािहतीनुसार इतिवृत्त चार वेळा तयार करण्यात अाले. हे प्रकरण उजेडात अाल्यानंतर शिवसेना सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली हाेती. यावेळी कुलकर्णी यांनी माझी रात्री स्वाक्षरी घेण्यात असून, यापासून मला अंधारात ठेवण्यात अाल्याचा बचाव केल्याचे समजते. याप्रकरणी शिवसेना सदस्य अाता अाक्रमक झाले असून, बाेगस ठराव करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी सदस्यांनी केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...