आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपमध्ये सामना; समीकरणे बदलण्याचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषद पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग अाला असून, पंचायत समिती सभापतिपदावर भाजपने दावा केला असला, तरी शिवसेना पद साेडणार नसल्याने भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत अाहेत. २८ जून राेजी पंचायत समिती सभापतिपदाची निवड हाेणार असून, हे पद मिळाल्यास त्याचे परिणाम त्यानंतर दाेन दिवसांनी हाेणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत दिसून येतील, असे भाजपच्या गाेटातून सांगण्यात येत अाहे.
राज्यात अाणि केंद्रात भाजपप्रणीत सत्तेत शिवसेना सहभागी असली, तरी दाेन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी साेडत नाहीत. याचे पडसाद अाठ-महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील काही महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर उमटणार अाहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली, तरी दाेन्ही पक्षांतील पदाधिकारी-नेते एकमेकांवर कुरघाेडी करण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र अाहे. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले हाेते. जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचपैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवला हाेता. त्यामुळे जिल्ह्यात भाजप ‘माेठ्या’भावाच्या भूमिकेत असल्याने शिवसेना ग्रामीण भागातील अापले वर्चस्व कायम कसे राहील, यासाठी प्रयत्न करत अाहे. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सत्ता खेचून अाणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली अाहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता स्थापनेनंतर पुढील अाठवड्यात चित्र स्पष्ट हाेईल.

भाजपमध्ये अंतर्गत वाद सर्वश्रुत अाहे. लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत अकाेला जिल्हावासीयांनी भाजपला काैल दिला. केंद्र नंतर राज्यात भाजपची सत्ताही स्थापन झाली. मात्र, जिल्ह्यात विकासाची गंगा वाहताना दिसून येत नाही. पक्षातील अंतर्गत कुरघाेडीच्या राजकारणाचा फटका विकासकामांना बसत असल्याचा अाराेप जनतेमधून हाेत अाहे. या कुरघाेडीचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत दिसून येण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत अाहेत.

भारिप-बमसं देणार महिलेला संधी?
जिल्हा परिषद अध्यक्षपद अाेबीसीसाठी राखीव असून, सर्वाधिक २४ सदस्य असलेल्या भारिप-बमसंमध्ये अध्यक्षपदासाठी जवळपास ११ जण पात्र अाहेत. विद्यमान अध्यक्ष पुरुष असल्याने उर्वरित काळासाठी महिलेच्या हाती सत्तेची किल्ली देण्याच्या विचारात पक्षश्रेष्ठी असल्याचे समजते. ११ मध्ये महिला सदस्यांचा समावेश अाहे. गत अाठवड्यात काही महिला इच्छुक सदस्यांनी शिष्टमंडळाद्वारे अध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली. भारिप-बमसं कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापतिपद मिळवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

असे अाहे बलाबल सभापती होणार भाजपचाच
^अकाेलापंचायतसमिती सभापतिपदावर भाजप दावा करणार अाहे. याबाबत शिवसेनेशी चर्चा करण्यात येणार अाहे. पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेनंतर िजल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष िनवडीच्या भूमिकेबाबत िनर्णय घेण्यात येईल. तेजरावथाेरात, िजल्हाध्यक्ष भाजप.

सभापती होणार शिवसेनेचाच
^यापूर्वीच्या फाॅर्म्युल्यानुसार जास्त सदस्यांच्या पक्षाचाच सभापती हाेणार असून, शिवसेनेकडे सर्वाधिक सदस्य अाहेत. मुळात भाजपचे अाठच सदस्य असून, दुसऱ्या पक्षातील सदस्य भाजपमध्ये गेला म्हणजे मूळ सदस्य संख्या जास्त झाली, असे नाही. श्रीरंगिपंजरकर, जिल्हाध्यक्ष शिवसेना
बातम्या आणखी आहेत...