आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री शिक्षक पतसंस्थेच्या पाठीशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. बँकेची आमसभा आज, रविवारी प्रमीलाताई ओक हॉलमध्ये पार पडली. तत्पूर्वी बँकेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई वाघोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. रणजीत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमीरउल्लाखाँ पठान, सभापती माधुरीताई गावंडे, रेखाताई अंभोरे देवकाबाई पातोंड आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बुलडाणा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या फुंडकर यांनी बँकेच्या एकूणच कार्यपद्धतीची भरभरुन प्रशंसा केली. ते म्हणाले, बऱ्याच सहकारी संस्था अशा आहेत की त्या, ज्या गतीने वाढतात त्याहीपेक्षा अधिक गतीने खाली कोसळतात. मात्र सदर पतसंस्था ही त्याला अपवाद ठरली असून संचालक मंडळाची सुयोग्य चमू ही तिच्या अखंड यशाचे गमक आहे. त्यामुळे या पतसंस्थेला मी सदैव मदत करेन.

पालकमंत्री डॉ. पाटील यांनीही यावेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, अकोल्याचा रहिवासी असल्याने मी या पतसंस्थेचा कारभार जवळून पाहिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणताही भत्ता घेत नाहीत. शिवाय संचालक मंडळाचा अवांतर खर्चही नाही. या बँकेची अधिक भरभराट होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

७५ शिक्षक, १६ विद्यार्थ्यांचा सत्कार : गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सुमारे ७५ शिक्षकांचा सत्कार केला गेला. याशिवाय दहावी, बारावी, स्नातक, स्नातकोत्तर आणि विविध परीक्षांमधील यशाबद्दल सदस्यांच्या १६ पाल्यांचा गौरवही केला गेला. कार्यक्रमाचे संचालन पतसंस्थेचे संचालक प्रशांत आकोत यांनी केले. तर आभार अन्य एक संचालक संजय इंगळे यांनी मानले. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर टोहरे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या एकूण वाटचालीचा आढावा मांडला.

यांचीही होती उपस्थिती : कार्यक्रमालाजिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, निरंतर शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, शोभाताई शेळके, अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत, माजी अध्यक्ष सुनील केणे, माजी उपाध्यक्ष तथा संचालक राजेश सावरकर आदींचीही उपस्थिती होती.

आ.देशपांडे यांनी घडवली विनोदी सफर : कमीटक्केवारीने उत्तीर्ण होऊनही आमदार झालो. मात्र आज अधिक टक्केवारी असलेल्यांचा मीच सत्कार करतोय, असे सांगत प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थितांना चांगलेच हसवले. याचा अर्थ कमी िशकलेलेच आमदार होतात, असे नाही तर डॉ. रणजीत पाटील हे दहावीत मेरीट होते, असे लगेच स्पष्ट करुन त्यांनी विद्वत्ता कार्यक्षेत्र ही प्रत्येकाची स्वतंत्र आवड असते, असा खुलासा केला. त्यामुळे पालकांनी मुलांवर आपले निर्णय लादता त्यांना त्यांच्या आवडीनुसार भरारी घेऊ द्यावी, असा सल्ला दिला.

ससाने यांचा शिक्षक ते अधिव्याख्याता प्रवास
पतसंस्थेचे सदस्य असलेल्या अंकुश ससाने यांनी अलिकडेच म. रा. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेनंतर ते िजल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत (डायट) अधिव्याख्याता म्हणून नियुक्त झाले आहे. त्यांच्या या यशाचा आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...