आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - याकूब मेमन याला गुरुवारी फाशी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संपूर्ण जिल्हाभर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यासाठी बुधवारी रात्रीपासून तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अकोला जिल्हा संवेदनशील असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित घटना घडू नये, यासाठी बुधवारी सायंकाळी बैठक घेतली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा आणि दक्षतेचा इशारा दिला होता. त्यासाठी संवेदनशील भागात फिक्स पाॅइंट तयार करण्यात आले होते. आरसीपी, क्युआरटीचे पथक संवेदनशील भागांवर लक्ष ठेवून होते. गुरुवारी जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या होत्या. ताजनापेठ, जुने शहर, सिंधी कॅम्प परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.