आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी घेतला जिल्ह्यातील भूसंपादन पुनर्वसन कामांचा आढावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची माहिती घेताना प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर करून भूसंपादन पुनर्वसनाची कामे प्राधान्याने करा, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिल्या आहेत.

१४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात त्यांनी भूसंपादन पुनर्वसन कामाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सहायक आयुक्त पुनर्वसन ओ. आर. अग्रवाल, भूसंपादन अधिकारी शरद पाटील, मिलिंद शेगावकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, शैलेश हिंगे, गजानन निपाणे, तसेच अकोला पाटबंधारे विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे वाई शहापूर प्रकल्पाच्या भूसंपादन पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हा प्रकल्प तातडीने पूर्ण झाल्यावर जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वाई प्रकल्पातील पुनर्वसित गाव मौजे खरप नवले या गावाचा पुनर्वसन आराखडा मंजूर असून, नागरी सुविधांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम त्वरित करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले. या वेळी जिल्ह्यातील इतर सिंचन प्रकल्पांच्या कामाचा आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला. मुख्यमंत्री यांचे सचिव यांनी १० जुलै रोजी विभागातील प्रकल्पांच्या भूसंपादन पुनर्वसन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सद्य:स्थिती जाणून घेतली तसेच १७ जुलै रोजी ते पुन्हा याबाबत आढावा घेणार आहेत. याशिवाय येणाऱ्या ऑगस्ट रोजी व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे वाई शहापूर प्रकल्पाच्या भूसंपादन पुनर्वसनबाबत आढावा घेणार आहेत. त्यामुळे या कामांना प्राधान्य देण्याबाबत निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

मुख्यमंत्री संनियंत्रण कक्ष
विदर्भातीलसिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री संनियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून, त्यामध्ये अमरावती विभागातील १० प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई अकोट तालुक्यातील शहापूर प्रकल्पांचा यात समावेश असून, या प्रकल्पांचा समावेश वाररूममध्ये केलेला असून, प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश आहेत.

सिंचन सद्य:स्थिती
मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्त राजूरकर. उपस्थीत जिल्हाधिकारी, अधिकारी.
प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा
बातम्या आणखी आहेत...