आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभरा बियाणे घाेटाळा : कृषी वितरकांनी नाेटीस दाखल केल्याने कारवाईला ‘ब्रेक’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभेत अाक्रमकपणे प्रश्न उपस्थित करताना सदस्य. - Divya Marathi
सभेत अाक्रमकपणे प्रश्न उपस्थित करताना सदस्य.
अकाेला - हरभरा बियाणे घाेटाळ्यात कारवाई रखडल्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद सर्व साधारण सभेत जिल्हा कृषि अधिकाऱ्यांना (एडीअाे) चांगलेच धारेवर धरले. ९९ लाख ४९ हजार रुपयांचा घाेटाळा का दाबण्यात येत अाहे, कृिष केंद्रांचे परवाने का रद्द करण्यात अाले नाहीत, अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच सदस्यांनी केली. यावर एडीअाेंनी स्पष्टीकरण दिले. याच चर्चेदरम्यान कृषी वितकरांनी कॅव्हेट (दावापूर्व नाेटीस / सावधान पत्र) दाखल केल्याची बाब उजेडात अाल्याने सदस्य अधिकच अाक्रमक झाले. अखेर जि.प. अध्यक्षांनी कारवाईचा अादेश दिला. घाेटाळ्यातील चाैकशी अहवालावर दै. दिव्य मराठीने वृत्तमािलकेच्या माध्यमातून सर्वप्रथम प्रकाशझाेत टाकला हाेता, हे येथे उल्लेखनीय. 
 
हरभरा बियाणे वितरणात शासनाची ९९ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात अाला, असा ठपका उच्चस्तरीय चाैकशी पथकाने अहवालात ठेवला हाेता. याच घाेटाळ्यावर गुरुवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विराेधक प्रचंड अाक्रमक झाले. शिवसेनेचे सदस्य नितीन देशमुख, चंद्रशेखर पांडे, शाेभा शेळके, विजय लव्हाळे, दामाेदर जगताप, गजानन उंबरकार, गाेपाल काेल्हे यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. एडीअाे हनुमंत ममदे यांनी अापण कर्तव्यात काेणतीही कसूर केली नाही अािण करणारही नाही, असे स्पष्ट केले. याबाबत पाेिलसांकडे तक्रार केली हाेती. मात्र पाेलिसांनी याेजना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (एसएअाे) कार्यालयाने राबवल्याने अािण फसवणूक एसएअाे कार्यालयाची झाल्याने त्यांनीच तक्रार देणे अावश्यक अाहे, असे सांगितल्याचे एडीअाे म्हणाले. याप्रकरणी परवाने रद्द करण्यासाठी नियमानुसार सक्तिीची कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अखेर जि.प. अध्यक्ष संध्या वाघाेडे यांनी एडीअाेंना कारवाईचा अादेश दिला. सभेला उपाध्यक्ष जमीर उल्ला खान, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, महिला बाल कल्याण सभापती देवकाबाई पाताेंड, समाकल्याण सभापती देवानंद अंभाेरे, कृषि सभापती माधुरी गावंडे यांच्यासह सदस्य , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्हि. के. खिल्लारे, श्रीराम कुळकर्णी उपस्थित हाेते. 
 
कॅव्हेटसाठीसंधी दिल्याचा अाराेप : हरभरा बियाणे घाेटाळ्यात कारवाई रखडल्याने सदस्यांनी एडीअाेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. अधिकारी कृषि केंद्रांची मिलीगत असल्याचा अाराेप सदस्य पांडे यांनी केला. कॅव्हेटसाठी संधी देण्यात अाली काय, असा सवालही त्यांनी केला.
 
शेतकऱ्यांकडून जादा बियाणे खरेदी केल्याचे कृषि केंद्रांकडून लिहून घेण्यात येत अाहे, असेही पांडे यांनी सांगितले. ४१ वितरकरांपैकी केवळ चारच वितरकांना हजार बियाणे का देण्यात अाले, असा सवाल शाेभा शेळके यांनी उपस्थित केला. 
 
शिस्तभंगाचा ठराव 
शेतकऱ्यांच्या बियाण्यांवर डल्ला मारण्यात अाल्याचा अाराेप सदस्य नितीन देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांना बियाणे मिळाले कि नाही, हे पाहण्याची जबाबदारी एडीअाेंची हाेती. या प्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करवाई करा, असे म्हणत तसा ठरावच देशमुख यांनी मांडला. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, अाधी नाेटीस, नंतर हाेणार सुनावणी... 
बातम्या आणखी आहेत...