आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : श्रावणात भक्तांची रामेश्वर मंदिरात मांदियाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री रामांनी स्थापन केलेले शिवलिंग. - Divya Marathi
श्री रामांनी स्थापन केलेले शिवलिंग.
सिंदखेडराजा - जिजाऊंच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या सिंदखेडराजा शहराला ऐतिहासिक पौराणिक महत्व असून, येथे हेमाडपंती रामेश्वर मंदिर आहे. या मंदिरात शरभंग ऋषींनी श्री रामांच्या हस्ते मूर्तीची स्थापना केली होती अशी आख्यायिका आहे. श्रावण मासानिमित्त याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. 
 
सिंदखेडराजा येथे पौराणिक काळात शरभंग ऋषींचा आश्रम होता, अशी आख्यायिका आहे. त्याच काळात येथे श्रीरामांच्या हस्ते ग्रामदैवत रामेश्वराची स्थापना झाली असे मानले जाते. येथे महारोगाने पीडित शरभंग ऋषींचे जपानुष्ठान होत असताना त्याच काळात वनवासात असलेल्या प्रभू श्रीरामांचे येथे आगमन झाले. त्यावेळी शरभंग ऋषींना त्यांचे दर्शन झाले. महापंडित शरभंग ऋषींना त्याचा मोठा आनंद झाला. येथून जाताना प्रभू रामचंद्रांनी त्यांना इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा ऋषींना येथे आपल्या हातून श्री महादेवाच्या लिंगाची स्थापना करावी, अशी विनंती केली. रामचंद्रांनी तत्काळ येथे शिवलिंग स्थापन करून जमिनीतून जलधारा निर्माण केली. कितीही दुष्काळाची स्थिती असली तरी, येथे असलेली विहीर तीर्थ स्थानी येणाऱ्यांची तृष्णा भागवते. त्यानंतर हेमाडपंती-यांनी येथे भव्य रामेश्वर मंदिराचे निर्मिती केली. याच मंदिराशेजारी राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आहे. मुख्य मंदिर दगडाचे असून कळस विटांनी बांधलेले आहे. आपल्या आईच्या इच्छेनुसार राजे लखुजीराव जाधवांनी त्या काळी रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. येथे श्रावाणात भाविकांची गर्दी असते. 
 
लक्ष देण्याची आवश्यकता 
बाल शिवबा जिजामाता काही काळ येथे वास्तव्य करून पुण्यास जाताना रामेश्वराचे दर्शन घेऊन पुढे गेले, असा उल्लेख इतिहासात आढळतो. रामेश्वर मंदिरासमोर विस्तीर्ण राम बारव होती. ती आता बुजलेली आहे. अशा या महत्वपूर्ण धार्मिक स्थळाकडे पुरातत्व विभागाने लक्ष देऊन डागडुजी करावी. 
बातम्या आणखी आहेत...