आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे संकलनासाठी उरले अाता दोन दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - दिव्यमराठी आणि आणि राजमाता जिजाऊ फाऊंडेशन यांनी सुरु केलेल्या ‘एक दिवाळी श्रीमंतांची’ या उपक्रमा अंतर्गत कपडे संकलनासाठी आता केवळ दोन दिवस उरले आङेत. शहरात विविध ठिकाणी कपडे संकलनाची व्यवस्था केलेली असून या केंद्रांवर आपल्या घरातील कपडे देऊन आपली दिवाळी साजरी करताना इतरानाही करता यावी, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उत्साह आणि आनंदाची उधळण असलेला दिवाळी सण सर्वाना साजरा करता यावा, यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमात शहरातील प्रत्येक नागरिक सहभागी होऊ शकतात. आपल्या घरातील जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे ईस्त्री करुन आणून द्यावे. हे कपडे समाजातील गरजू लोकांना देऊन त्यांचा सणाचा आनंद वाढवण्यासोबतच आपला आनंद देखील द्विगुणीत करता येतो. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरातील मुलांचे ड्रेस, शर्ट,पॅन्ट, साड्या, पंजाबी ड्रेस चांगले धुऊन, इस्त्री करून बुधवार, २६ ऑक्टोबर पर्यंत जमा करावे. हे कपडेर रतनलाल प्लॉट चौक येथील गणराजा उपहार गृह डाबकी रोडवरील युगंधर चौकातील यशवंत इलेक्ट्रिकल्स, राजेश तिवारी, धरोहर अपार्टमेंट, विजय हाऊसिंग सोसायटी, खंडेलवाल कॉन्व्हेंट जवळ, गोरक्षण रोड येथे आणून द्यावे. तसेच फाऊंडेशनचे विपीन गावंडे यांना ९९६०२६५२०२ किंवा रवी डिडवानी यांना ९०११४७०३७० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

याशिवाय अमित यादगिरे, राजेश तिवारी, अमर बेलखेडे, विपुल दुबे यांना देखील संपर्क साधावा. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सणाचा आनंद द्विगुणीत करण्याचे आवाहन दैनिक दिव्य मराठी आणि राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...