आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘‌वेळ कुणासाठी थांबत नसतो, याचे भान ठेवावे’, दहावीच्या विद्यार्थ्यांना घड्याळ आणि पेनसेटचे वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वेळ कुणासाठीही थांबत नसतो, त्यासाठी वेळेची किंमत करणे शिका कारण एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नसते. ही बाब लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करून शांततेत पेपर सोडवा, असे प्रतिपादन मायबोली कोचिंग क्लासेसच्या संचालिका सीमा बक्षी यांनी केले. 
 
दिव्य मराठी, प्रभात किड्स, मायबोली कोचिंग क्लासेस, रेडक्रॉस सोसायटी श्री रेणुका माता मित्र मंडळाच्या वतीने महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून राबवण्यात येणाऱ्या मिशन २६ अंतर्गत दहावीची परीक्षा देणाऱ्या १५ विद्यार्थी विद्यार्थिनींना हाताताली घड्याळ पेनसेट वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजू अवधुत होते. या वेळी सीमा बक्षी नितीन बक्षी यांनी विद्यार्थ्यांना पेपर कसा सोडवायचा? परिक्षेच्या आधी नेमका कसा अभ्यास करायचा? याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 

२०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षापासून मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन २६ राबवण्यात येत आहे. या मिशनमधील चार विद्यार्थिनींची ग्रॅज्युएट पर्यंतची शैक्षणिक जबाबदारी डॉ. गजानन नारे, सिमा बक्षी डॉ. मोनिका मालोकार यांनी उचलली आहे, तर २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षातही हे मिशन राबवण्यात आले. आठवड्यातून दोन दिवस प्रभात किड्स दोन दिवस मायबोली कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी जात होते. या विद्यार्थ्यांना जाणे-येणे करण्यासाठी प्रभात किड्सच्या वतीने बस उपलब्ध केली होती. मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बोचरे यांनी केले. या वेळी नितीन देशमुख, श्रीकांत जोगळेकर, मुकुंद गिरी आदींसह शाळेतील शिक्षक, शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 
 
बातम्या आणखी आहेत...