आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन २६’ च्या विद्यार्थ्यांना दिवाळीची आगळी वेगळी भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दैनिकदिव्य मराठी, मायबोली कोचिंग क्लासेस, प्रभात किड्स स्कूल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी रेणूका माता मित्र मंडळ यांच्या वतीने मागील वर्षीपासून राबवण्यात येत असलेल्या मिशन २६ या महाअभियान अंतर्गत कापड, चप्पल, रजिस्टर वह्या बँक सुरू केली. या बँकेत जमा झालेले ड्रेस, स्वेटर, चप्पल मनपा शाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना आगळी वेगळी दिवाळीची भेट देण्यात आली. मायबोली कोचिंग क्लास येथे २० ऑक्टोबर रोजी या उपक्रमाचा पहिला टप्पा पार पडला.
वीर भगतसिंग चौक येथील महापालिका शाळा क्रमांक २६ मध्ये मागच्या वर्षी दहावीची बॅच सुरू करण्यात आली. या बॅचची शैक्षणिक जबाबदारी उचलत दैनिक दिव्य मराठी, मायबोली कोचिंग क्लासेस, प्रभात किड्स स्कूल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रेणूका माता मित्र मंडळ यांच्या वतीने मिशन २६ सुरू करण्यात आले. या महाअभियान दरम्यान या विद्यार्थ्यांचा अार्थिक परिस्थितीचा विचार करता, त्यांना फक्त शैक्षणिक सहाय्य करता इतर बाबतीतही मदत व्हावी या उद्देशाने कापड बँक, चप्पल बँक रजिस्टर / वह्या बँक मार्च महिन्यात सुरू केली. मायबोली क्लासच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात पुढाकार घेत, सुरूवात स्वत: पासून केली. विद्यार्थ्यांनी त्यांचे जुने पण चांगल्या स्थितीतील ड्रेस तर दिलेच शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी नवीन ड्रेस देखील या बँक आणून दिले. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सहाय्याने बँकेत शेकडो ड्रेसेस जमा झाले. हे सर्व ड्रेस मिशन २६ मधील यंदा दहावीत असलेल्या ३० विद्यार्थ्यांना देण्यात आले. प्रभात किड्स स्कूलच्या स्कूलबसमध्ये विद्यार्थी मायबोली कोचिंग क्लासला आले. येथे त्यांनी स्वत:साठी ड्रेस घेताना आपल्या भाऊ, बहिणींसाठी सुद्धा ड्रेस, स्वेटर, चप्पल घेतले. क्लासच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वयाच्याच या नवीन मित्र- मैत्रिणींना दिवाळीची ही भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवला. या उपक्रमात मायबोली कोचिंग क्लासचे विद्यार्थी रौनक अग्रवाल, पायल वखारिया, मिताली पाटणी, अफीफ उर रहमान, इती अग्रवाल, सलोनी भट्टड, सिद्धी रांदड, सुहानी वर्मा यांचे पालक पवन अग्रवाल, कन्हैयालाल वखारिया, देवेंद्रराव पाटणी, रजनी पाटणी, फोटोग्राफर अत्ता उर रहमान भाई, मनोज अग्रवाल, संदेश रांदड, किर्ती रांदड, संजय वर्मा निशा वर्मा , अभिलाषा जाेध यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी मायबोली कोचिंग क्लासच्या संचालिका सीमा बक्षी, नितीन बक्षी, श्रीकांत जोगळेकर, नितीन देशमुख अादी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...