आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टरला पोलिस कोठडी, रोहिणखेडच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव बढे - अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या रोहिणखेड येथील बीएएमएस डॉक्टर दांपत्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून डॉक्टर क्षीरसागर यास अटक करण्यात आली होती. दरम्यान आज डिसेंबर रोजी या डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 

असाच अवैध गर्भपात करण्याचा प्रकार नुकताच काही दिवसांपूर्वी लोणार शहरातही घडला होता. त्या प्रकरणात डॉक्टरसह कुमारिकेच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन अटक सुद्धा झाली आहे. आणि आता हा प्रकार घडला आहे. रोहिणखेड येथे डॉ. संदीप क्षीरसागर यांचे क्षीरसागर नावाचे हॉस्पिटल प्रसूतिगृह आहे. या प्रसुतीगृहात अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सरिता पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्यासह पथकाने दवाखान्याची तपासणी केली असता त्यामध्ये गर्भपातासाठी वापरण्यात येणारी एमटीपीची किटसह गर्भपातासाठी लागणाऱ्या इतर औषधीही मिळुन आल्या. त्यामुळे सदर दवाखाना पंचासमक्ष सिल करण्यात आला. या प्रकरणी मोताळा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. संदिप क्षीरसागर, डॉ. गौरी क्षीरसागर, डॉ.विश्वास कैलास यांंच्या विरुध्द गुन्हा दाखल करून डॉ. संदिप क्षीरसागर यास पोलिसांनी अटक केली हाेती. दरम्यान आज डॉक्टरला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...