आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशय घेत असल्यामुळे "मुकुंद'चा केला खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- राणेगावयेथील रहिवासी मुकुंद गोपाळराव कुकडे या २२ वर्षीय युवकाची २१ सप्टेंबर रोजी दुपारी वाजताच्या सुमारास तिक्ष्ण हत्यारांनी अंत्यत निदर्यपणे क्रुरपणे जस्तगाव शेतशिवारात हत्या करण्यात आली. ज्या तरुणाने घटनेची माहिती मृतकाच्या चुलत्यांना दिली स्वत: जखमीस दवाखान्यात नेण्यास मदत केली, तोच हत्यारा आरोपी निघाला असून, पोलिसी खाक्यापुढे त्याने कबुली दिल्याने २१ वर्षीय सचिन भीमराव वानखडे रा. राणेगाव यास तेल्हारा पोलिसांनी अटक केली.
तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राणेगाव येथील जनार्दन बाबाराव कुकडे यांच्या जस्तगावातील शेतात ही घटना घडली होती. पोलिसांनी सोमवारी रात्रीच कसून चौकशी केली मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सचिनने मीच हत्या केल्याचा कबुली जबाब मंगळवारी सकाळी दिला. मृतक मुंकुंद कुकडे हा माझ्यावर संशय घ्यायचा, त्यामुळे सोमवारी दुपारी वाजता दोघात वाद झाला. वादाचे पर्यवसान खुनात झाले. घटनेबद्दल पश्चाताप होत आहे. असे सचिनचे म्हणने आहे.
सचिन वानखडेविरुद्ध भादंवि ३०२ चा गुन्हा नोंदवण्यात आला असून, घटनास्थळावरून पोलिसांनी काही वस्तू ताब्यात घेतल्यात. श्वान पथकदेखील घटनास्थळी येऊन गेले. सचिन वानखडे याचे वडील भीमराव वानखडे हे मृतकाच्या घरी घरगडी म्हणून कामावर होते. सचिन मुकुंद हे दोघे वर्गमित्र होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांचे परस्परांकडे जाणे-येणे होते.

अवघ्या ७२ तासांत आरोपी निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिस तपास कामी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा ठाणेदार अन्वर म. शेख, पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ भास्कर, भस्मे, हेड कॉन्स्टेबल गणपत गवळी, करुणा आतराम, करणकार, अनिल खिल्लारे, विलास अस्वार, अरुण अस्वार, विनोद गोलाईत, अरुण येनकर, गवई, नागोराव भांगे, चंदू सोळंके, दामोदर सोळंके यांनी कामगिरी बजावली.

मृतक मुकुंद कुकडे याचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अकोल्याहून राणेगाव येथे मंगळवारी दुपारी वाजता आणले. मृतदेह राणेगाव येथे येताच कुकडे कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. शोकाकुल वातावरणात राणेगाव येथील हिंदू स्मशानभूमीवर मुकुंद कुकडे यास त्याचे आजोबा गणेशराव कुकडे यांनी चिताग्नी दिला. अंत्यत मनमिळावू सुस्वभावी प्रेमळ असलेल्या मुकुंद कुकडे याच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. अंत्यसंस्कारावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी सोमवारपासून चौकशीसाठी आरोपीची आई, वडील भीमराव भाऊ या तिघांना ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे तेल्हारा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपीची कबुली
ज्यातरुणाने घटनेची माहिती मृतकाच्या चुलत्यांना दिली स्वत: जखमीस दवाखान्यात नेण्यास मदत केली, तोच हत्यारा निघाला असून, पोलिसी खाक्यापुढे त्याने कबुली दिली.
तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील शिवारातील घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली.