आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीपीसी’ निवडणुकीची तयारी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त पदांवरील भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परिणामी या समितीचे परिपूर्ण असे नवे रुप लवकरच पुढे येईल. 
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार डीपीसीतील रिक्त पदे निवडणुकीच्या माध्यमातून भरावयाची असतात. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची यादी गोळा करणे त्याच्या आधारे डीपीसीची मतदार यादी तयार करणे हे प्राथमिक काम सध्या निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडे हे काम सोपवले असल्याने त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच डीपीसीची मतदार यादी प्रकाशित करणार आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांपैकी १४, महापालिकेचे नगर परिषदांचे तीन अशा २४ सदस्यांची ही समिती आहे. 

महापालिका नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका अलीकडेच झाल्या. त्यामुळे जुने सदस्य कालबाह्य झाले असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी नवी रचना अस्तित्त्वात आणणे गरजेचे झाले आहे. 

डीपीसीवरील सदस्यत्वाचे सूत्र : ज्याजिल्ह्याची लोकसंख्या २० लाखांपेक्षा अधिक नसेल तेथील डीपीसी ३० पेक्षा अधिक सदस्यांची नसावी, हे शासनानेच ठरवून दिले आहे. त्यामुळे अकोल्याची डीपीसी किती सदस्यांची असावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाचे उत्तर १९९८ च्या महाराष्ट्र शासन जिल्हा नियोजन समिती (रचना कामे) अधिनियमान्वये सापडले असून, ते चार-पंचमांश असावे, असे आहे. त्यामुळे जिल्ह्याची डीपीसी २४ सदस्यीय ठरवली आहे. 

काय आहेत या निवडणुकीचे निकष 
लोकसंख्येची वर्गवारी जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येतील शहरी ग्रामीण नागरिकांचे प्रमाण यानुसार डीपीसीवर पाठवल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित केली जाते. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १८ लाख १३ हजार ९०६ आहे. यामध्ये ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांची संख्या सर्वाधिक १० लाख ३५ हजार ३४५ असून, मनपा क्षेत्राची लाख ३७ हजार १३७ तर नगर परिषद क्षेत्राची लाख ४१ हजार ४२४ आहे. या लोकसंख्येनुसारच जिल्हा परिषदेतून सर्वाधिक १४ सदस्य डीपीसीवर पाठवले जाणार असून, इतर दहा सदस्य मनपा नगरपरिषदांचे राहणार आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...