आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University Youth Festival

नृत्यांगनांच्या अदांनी घेतला रसिकांच्या मनाचा ठाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात युवा महोत्सवामध्ये साेमवारी स्व. डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये एकीकडे आई भवानीला गोंधळाला येण्याची विनवणी, तर दुसरीकडे लावणीच्या अदा दिसल्या. सोलो, ग्रुप प्रकारात झालेल्या या स्पर्धेत नृत्य छटांनी रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले, तर नृत्यांगनांच्या अदांनी मनाचा ठाव घेतला.

गोंधळ, जोगवा यांसह गुजरातचे लोकनृत्य गरबाने प्रेक्षकांना थिरकवले, तर आदिवासी नृत्यांमधून आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडले. क्लासिकल इंडियन डान्स आणि लोकनृत्य या दोन प्रकारात नृत्य सादर झाले. युवा महोत्सवात सहभागी झालेल्या ३७ महाविद्यालयांपैकी १२ महाविद्यालयांच्या चमूंनी लोकनृत्याचा आविष्कार सादर केला, तर सोलो प्रकारात सहा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी कला दाखवली. डॉ. आर. आर. शेळके यांनी उत्कृष्ट निवेदन केले, तर अंशू आलिमचंदानी, अमृता जटाळे आणि प्रियंका जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे नियोजन व्ही. आर. ठाकूर, डॉ. डी. टी. धुळे, डॉ. एस. के. अहेरकर यांनी केले.

सद्य:स्थितीवरभाष्य
फाइनआर्टच्या माध्यमातून कृषी आणि सद्य:स्थितीवर भाष्य केले. शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, पर्यावरणाचे संवर्धन, पाणी वाचवा यांसह अनेक ज्वलंत प्रश्नांचा कलेतून ऊहापोह केला. नऊ विद्यार्थ्यांनी रांगोळीतून, तर सहा विद्यार्थ्यांनी पोस्टरमधून आपले म्हणणे मांडले. कोलाज स्पर्धेत तिघांनी कलेचे दर्शन घडवले, तर ऑन स्पॉट पेंटिंग स्पर्धेत नऊ विद्यार्थ्यांचे कौशल्य पणाला लागले. तीन विद्यार्थ्यांनी क्ले मॉडलिंगमधून कलाकृती सादर केली. फाइन आर्ट विभागातील विविध प्रकारात मंगळवारीदेखील काही विद्यार्थी सहभागी होणार आहेत.