आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीचा गर्भपात करताना मृत्यू; लोणारच्या डॉ. पुरोहितला अटक, क्लिनिक सिल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणार (बुलडाणा)- गर्भपात करताना अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिचे आई-वडील डॉ. सुभाष पुरोहित यांचेवर २० नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. तसेच शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी आज साई क्लिनिकला सिल ठोकले आहे. 


लोणार तालुक्यातील आरडव येथील अल्पवयीन मुलीचा डॉ. पुरोहित यांच्या साई क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली. डॉ. पुरोहित उपचार करत असताना वडील पन्नाशा भोसले लता भोसले मुलीच्या सोबत दवाखान्यात होते. परंतु उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू होताच त्याठिकाणी गदारोळ झाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली तपास सुरू केला. १९ नोव्हेंबर रोजी मयत अल्पवयीन मुलीचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० नोव्हेंबर रोजी आई लताबाई भोसले, वडिल पन्नाशा भोसले डॉ. पुरोहित यांचेवर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...