आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी अनुदानामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्थानिक संस्था करापोटी शासनाकडून येणारे चार कोटी २० लाख रुपयांचे अनुदान या महिन्यात प्राप्त झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. दिवाळी तोंडावर आली असताना प्रशासनाने किमान एक महिन्याचे वेतन तसेच थकित महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

राज्य शासनाने जकात कर बंद करून स्थानिक संस्था कर लागू केला होता. परंतु, ऑगस्ट २०१५ पासून स्थानिक संस्था करही बंद केला. महापालिकेचे स्थानिक संस्था कर हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत होते. त्यामुळे शासनाने स्थानिक संस्था कर रद्द केल्यास त्यापोटी दर महिन्याला अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यातील विविध महापालिकांनी केली होती. राज्य शासनाने संबंधित महापालिकेचे स्थानिक संस्था कराचे उत्पन्न लक्षात घेऊन दर महिन्याला अनुदान देणे सुरू केले आहे. अकोला महापालिकेला महिन्याकाठी चार कोटी २० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
मनपाला तूर्तास एक महिन्याचे वेतन आणि एक महिन्याचे निवृत्तिवेतन देण्यासाठी पावणे पाच कोटी रुपये लागतात. त्यामुळे अनुदान मिळाल्यास महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांना वेतन देणे अवघड जाते. या अनुदानातही महापालिकेला निधी टाकावा लागतो. तूर्तास कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे तर शिक्षकांचे चार महिन्यांचे वेतन रखडले आहे. महापालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. शासनाचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. या महिन्यात अनुदान प्राप्त झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. दिवाळी लक्षात घेऊन एक महिन्याचे वेतन महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...