आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेसळ तूप विकणारी टोळी गजाआड, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डालडा आणि सोयाबीन तेलाच्या मिश्रणातून तयार भेसळयुक्त तूप विकणाऱ्या १० आरोपींना पोलिसांनी सोमवारी सकाळी गजाआड केले. या वेळी त्यांच्याकडून १७५ किलो भेसळ तुपाचा साठा जप्त करण्यात आला. बनावट तूप विकणारे सर्व आरोपी परभणी जिल्ह्यातील घोडगाव येथील रहिवासी आहेत. या निमित्ताने ऐन दिवाळीच्या काळात बनावट तूप विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांनी इतर पदार्थ खरेदी करताना सतर्कता बाळगण्याची गरज आहे. 
 
दिवाळी निमित्त तुपाला असलेली मागणी लक्षात घेता परभणी जिल्ह्यातील घोडगाव येथील नागरिक अकोल्यात आले आहे. शहरातील विविध भागात राहून ते तुपाची भेसळ करतात तुपाच्या नावाखाली घरोघरी जाऊन ३०० ते ४०० रुपये किलाे दराने विकतात. स्वत:च्या घरचे तूप असल्याचे भासवून गृहिणींच्या डोळ्यात धूळ फेकण्यात ते पटाईत असल्याने गृहिणी त्याला बळी पडत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांना मिळाली. त्यांनी जुने शहरातील गुरुदेव नगर कमला नेहरू नगरात सकाळी छापे टाकले. यावेळी त्यांना तुपात भेसळ करत असल्याचे दिसून अाले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी डालडा तेलाची भेसळ करून तूप विकत असल्याची कबुली दिली. 

यावेळी पोलिसांनी राजू अश्रू गिरी, शाम दत्ता गिरी, गुलाब दत्ता गिरी, अशोक नारायण गिरी, गजानन नारायण गिरी, भगवान ज्ञानेश्वर गिरी, नामदेव गिरी, यांच्यासह एका अल्पवयीन युवकाला अटक केली तर बापुभाऊ राठोड पळून गेला. सर्व आरोपीविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई एसडीपीओ उमेश माने पाटील, पीएसआय बाळकृष्ण पवार, पोहेकाॅ. श्रीकृष्ण इंगळे, रवि सिरसाट, विठ्ठल विखे, दीपक किल्लेदार, मिथीलेश सुगंधी जुने शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी केली. दिवाळीच्या सणात तूप,खवा आदी पदार्थांना मोठी मागणी असते. ही मागणी हेरून काळाबाजार केला जातो. 
 

तीन पदार्थांच्या मिश्रणातून तयार करीत होते भेसळ तूप 
निम्मा डालडा तेवढेच सोयाबीन तेल टाकायचे त्यात तूप तापवायच्या वेळी जी बेरी निघते. ती बेरी तुपाचा सुगंध यावा म्हणून टाकली जात होती. या तिघांचे मिश्रण करून भेसळयुक्त तूप बनवले जात होते. 
 
डालड्याचे १६० किलो पाकीट पोलिसांनी केले जप्त 
पोलिसांनी छापे टाकून दहा आरोपींसह त्यांच्याकडे असलले भेसळयुक्त तूप- १७५ किलो, डालड्याचे पाकिट १६० किलो, वापरण्यात येणारी बेरी ४० किलो, गॅस सिलिंडर-शेकडी इतर साहित्य जप्त केले. 
बातम्या आणखी आहेत...